झोपेच्या गोळ्या, मृतदहाचे 15 तुकडे, पतीचा परफेक्ट मर्डर

On: March 19, 2025 5:16 PM
UP murder
---Advertisement---

Murder News l मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूतच्या निर्घृण हत्येने संपूर्ण परिसर हादरला आहे. पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिच्या प्रियकराने मिलून या हत्येची रचना केली होती. झोपेच्या गोळ्या, मृतदेहाचे तुकडे, ड्रम आणि सिमेंटचा वापर करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र एका चुकीमुळे पोलिसांनी संपूर्ण सत्य उघड केले.

विवाहबाह्य संबंध आणि कट रचण्याची सुरुवात :

सौरभ आणि मुस्कान यांनी २०१६ मध्ये प्रेमविवाह केला होता. सौरभने आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी मर्चंट नेव्हीची नोकरी सोडली, मात्र त्यामुळे दोघांचे कुटुंबीय नाराज होते. काही वर्षांनंतर, मुस्कानचे साहिल शुक्लाशी विवाहबाह्य संबंध जुळले आणि यामुळे सौरभ व मुस्कानमध्ये वारंवार वाद होत होते. अखेर मुस्कान आणि साहिलने त्याचा काटा काढण्याचा कट रचला.

४ मार्च रोजी, मुस्कानने सौरभच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. तो गाढ झोपल्यानंतर, साहिलने त्याचा चाकूने खून केला. मृतदेहाचे १५ तुकडे करून त्यांना एका मोठ्या ड्रममध्ये भरून सिमेंटने सील करण्यात आले, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये.

Murder News l समाजमाध्यमांचा गैरवापर आणि पोलिसांची चौकशी :

हत्या लपवण्यासाठी मुस्कान आणि साहिल मनालीला गेले आणि सौरभच्या मोबाईलवरून त्याच्या सोशल मीडिया हँडलवर फोटो अपलोड करत राहिले. मात्र, सौरभने काही दिवस फोन न उचलल्याने कुटुंबीयांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तपास सुरू केला असता मुस्कान आणि साहिल यांच्यावर संशय बळावला. कसून चौकशीनंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मेरठ शहराचे पोलिस प्रमुख आयुष विक्रम सिंह यांनी या प्रकरणाचा तपशील उघड केला असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

News title : Murder Mystery Solved: Wife’s One Mistake Exposed the Brutal Killing of Merchant Navy Officer

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now