मुरलीधर मोहोळ अखेर बोलले; केला सर्वात मोठा खुलासा

On: October 21, 2025 11:13 AM
Muralidhar Mohol
---Advertisement---

Muralidhar Mohol | पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी एक मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) येण्याची ऑफर मिळाली होती, असा खुलासा त्यांनी केला आहे. तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) नगरपरिषदेच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला.

सुनील शेळकेंनी दिली होती ऑफर

मुरलीधर मोहोळ म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मावळचे (Maval) सध्याचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke), जे त्यावेळी भाजपमध्ये (BJP) होते, त्यांना पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आली. यानंतर शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली. याच काळात सुनील शेळके यांनी आपल्याला फोन केला होता.

मोहोळ यांनी तो संवाद उलगडताना सांगितले, “शेळकेंनी मला फोन करून सांगितले की, ‘माझं भाजपमधून तिकीट कट झालं आहे, मला राष्ट्रवादीतून तिकीट मिळालं आहे. तुझं पण तिकीच कट झालं आहे. कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील आले आहेत, त्यामुळे तू माझ्याबरोबर राष्ट्रवादीत ये.'”

Muralidhar Mohol | “मी दिल्या घरी सुखी आहे”

या ऑफरवर आपण सुनील शेळके यांना स्पष्ट नकार दिल्याचे मोहोळ म्हणाले. “मी त्यांना म्हणालो की, मी दिल्या घरी सुखी आहे. तू पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ नकोस,” असे आपण त्यांना सुचवले होते. मात्र, त्यावर शेळके म्हणाले की, “आता मी परतीचे दोर कापले आहेत.”

हा किस्सा सांगताना मोहोळ यांनी त्यांच्या मैत्रीवरही भाष्य केले. “तो त्या पक्षात गेला, त्याचं भलं झालं. मी माझ्या पक्षात राहिलो, माझंही भलं झालं. कारण आमची मैत्री अशी आहे,” अशी पुस्ती जोडायलाही ते विसरले नाहीत. मुरलीधर मोहोळ यांच्या या खुलाशामुळे २०१९ च्या निवडणुकीदरम्यानच्या पडद्यामागील घडामोडी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

News Title- Muralidhar Mohol Reveals Past NCP Offer From Shelke

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now