karuna sharma | धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्यात सुरू असलेल्या पोटगी प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. करुणा शर्मा यांनी माध्यमांसमोर बोलताना एक धक्कादायक दावा करत सांगितलं की, “माझ्यासोबत लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे २० कोटी रुपये देणार होते.” या वक्तव्यामुळे राजकीय आणि वैयक्तिक वाद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
२० कोटींचा सौदा आणि दलालांचा प्रभाव?
करुणा शर्मा म्हणाल्या, “माझा पती म्हणजे धनंजय मुंडे एवढा वाईट नाही. पण त्याने आपल्या आजूबाजूला दलाल लोकांना जमवलं आहे. याच दलाल मंडळींच्या सांगण्यावरून त्यांनी अनेक चुकीचे निर्णय घेतले आणि आमचं वैयक्तिक जीवन उध्वस्त केलं.”
त्यांनी असा दावा केला की, जर कोणी माझ्यासोबत लग्न केलं असतं, तर मुंडेंनी त्याला २० कोटी रुपये देऊन रोखण्याचा प्रयत्न केला असता. “या सौद्याचं मला थेट सांगण्यात आलं होतं. मात्र मी निर्णय घेतला की, चित्रपटाची संधी असूनही मी पतीसोबतच राहीन,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
नावावर काही नाही, कायम धमक्या – करुणा शर्मांचा आक्रोश
करुणा शर्मा यांनी पुढे सांगितलं, “माझ्या नावावर काहीही नाही. मी आणि माझ्या मुलांना कायम धमकावलं जातं. घरात शांततेनं राहण्याचाही अधिकार राहिलेला नाही. मी गाडी घेऊन कोर्टात आले, त्यावरूनही हंगामा करण्यात आला.”
त्यांनी असा दावा केला की, “धनंजय मुंडे यांनी माझं संपूर्ण आयुष्य रस्त्यावर आणलं. मी पहिली पत्नी असूनही माझी ओळख झाकली जातेय. माझ्या हातात काही राहिलं नाही, पण मी न्यायासाठी लढतेय.”
न्यायालयीन लढाई अधिक तीव्र होणार
या सगळ्या पार्श्वभूमीवर पोटगी प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं होत चाललं आहे. कोर्टात सादर केलेले पुरावे, रेकॉर्डिंग्स आणि वसीयत संबंधित कागदपत्रांवरून पुढे काय निर्णय होतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.
Title: Munde Offered ₹20 Cr to Stop My Marriage: Karuna






