सावधान! हिवाळ्यात पसरतोय ‘हा’ धोकादायक आजार?

On: November 27, 2024 1:42 PM
Covid Update
---Advertisement---

Health l गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक आजार देखील डोकं वर काढत आहेत. अशातच आता हिवाळ्यात एका साथीच्या रोगाने ब्रिटनमध्ये धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे ब्रिटनच्या आरोग्य संस्थांनी या साथीच्या आजाराबाबत अलर्ट देखील जारी केला आहे.

‘या’ नागरिकांना धोका? :

ब्रिटनमध्ये गालगुंड हा रोग वेगाने पसरत आहे. गेल्यावर्षी अमेरिकेमध्ये या आजाराची तब्बल 36 प्रकरणे नोंदवली गेली होती. त्यामुळे 2020 मध्ये या साथीच्या 3738 प्रकरणांची नोंद देखील झाली आहे. यासंदर्भात डॉक्टरांनी दावा केला आहे की, यावेळी हिवाळ्यात साथीचा राग येण्याची शक्यता आहे. मात्र हा आजार किशोर आणि तरुणांमध्ये पसरण्याची शक्यता आहे.

या आजारामुळे लोकांना MMR लस घेण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे. तसेच लोकांना ही लस मिळत नसल्याने ब्रिटनमध्ये गोवरचे रुग्ण देखील वाढले आहेत. तसेच 2019 साली गालगुंडाची तब्बल 5718 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

Health l थंडीच्या काळात हा आजार पसरणार :

यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी (UKHSA) चे डॉ. आंद्रे चार्लेट यांनी यासंदर्भात दावा केला आहे की, सध्या या आजाराची प्रकरणे कमी प्रमाणात आहेत. परंतु थंडीच्या काळात हा आजार अचानकपणे वेगाने पसरू शकतो. तसेच लसीकरण न केलेल्या प्रौढांसाठी देखील याचा धोका जास्त असतो.

तसेच गोवर, गालगुंड आणि रुबेला यांसारख्या आजारांवर केवळ MMR ही लस प्रभावी ठरत आहे. दरम्यान,15 वर्षांत प्रथमच इंग्लंडमध्ये या आजाराची सर्वात कमी प्रकरणे नोंदवली गेल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे या आजारासंदर्भात काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

News Title : mumps disease spread in britain

महत्त्वाच्या बातम्या- 

राज्यातील ‘या’ विधानसभा मतदारसंघात पुन्हा होणार मतमोजणी

थंडी वाढणार, हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, भाजपकडे केली सर्वात मोठी मागणी

सर्वात मोठी बातमी! नाराज एकनाथ शिंदेंना भाजपकडून दोन मोठ्या ऑफर

मुंबईकरांनो ‘या’ भागातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणारं!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now