Sahar Sheikh News | मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच मुंब्र्यातील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. विजय मिळाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचं नाव न घेता “कैसा हराया…?” असं म्हणत डिवचल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. आता मात्र त्यांच्या एका विधानामुळे त्या अडचणीत सापडल्या आहेत.
सहर शेख यांनी विजय मिळवत सर्वांनाच धक्का :
महापालिका निवडणुकीपूर्वी सहर शेख यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला होता. मुंब्रा हा जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला मानला जातो. (Sahar Sheikh News)
मात्र याच मतदारसंघातून सहर शेख यांनी विजय मिळवत सर्वांनाच धक्का दिला. त्यांच्या विजयानंतर केलेल्या वक्तव्यांमुळे त्या सतत चर्चेत राहिल्या.
Sahar Sheikh News | पोलिसांची नोटीस, वक्तव्यावर आक्षेप :
दरम्यान, “मुंब्र्याला हिरवं करायचं आहे” या त्यांच्या विधानावरून पोलिसांनी आक्षेप घेतला आहे. समाजात असंतोष निर्माण होऊ शकतो, अशा स्वरूपाचं भाषण किंवा सोशल मीडियावर पोस्ट टाळाव्यात, अशा सूचना देत मुंब्रा पोलिसांनी सहर शेख आणि त्यांचे वडील युनिश शेख यांना नोटीस बजावली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 168 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. (Mumbra AIMIM Corporator)
या नोटीसमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सहर शेख यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्यांनंतर आता पोलिसांची कारवाई झाल्याने मुंब्र्यातील राजकारण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






