IPL 2025 l आयपीएल 2025च्या 33व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ने सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) वर 4 विकेट्सनी विजय मिळवत गुणतालिकेत महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. या विजयामुळे मुंबईचा क्रमांक सुधारला असून, हैदराबादची घसरण नवव्या स्थानी झाली आहे.
मुंबई सातव्या क्रमांकावर, हैदराबाद नवव्या स्थानी :
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 7 सामने खेळले असून त्यापैकी 3 विजय मिळवले आहेत. उर्वरित 4 सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे मुंबईच्या खात्यात सध्या 6 गुण आहेत आणि त्यांनी गुणतालिकेत सातवे स्थान मिळवले आहे.
दुसरीकडे, हैदराबादचा फॉर्म काहीसा ढासळलेला आहे. त्यांनी देखील 7 सामने खेळले असून केवळ 2 सामने जिंकले आहेत. उर्वरित 5 सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे SRH चे 4 गुण असून संघ नवव्या क्रमांकावर घसरला आहे. चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) 7 सामन्यांत 2 विजय आणि 5 पराभवांसह तळाशी – दहाव्या स्थानावर आहे.
IPL 2025 l दिल्ली अव्वल स्थानी, गुजरात आणि RCB मागे :
सध्या गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आघाडीवर आहे. त्यांनी 6 पैकी 5 सामने जिंकले असून त्यांचे 10 गुण आहेत. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) दुसऱ्या स्थानी असून त्यांनी देखील 6 सामने खेळून 4 विजय मिळवले आहेत. त्यांचे एकूण 8 गुण आहेत. तिसऱ्या स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) असून पंजाब किंग्ज (Punjab Kings) चौथ्या स्थानावर आहे.
गुरुवारी झालेल्या सामन्यात, हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमोर 163 धावांचे लक्ष्य ठेवले होते. अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) 40 आणि हेनरिक क्लासेनने (Heinrich Klaasen) 37 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात मुंबईने 18.1 षटकांत हे लक्ष्य गाठत सामना जिंकला.






