मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ भागातील पाणीपुरवठा बंद राहणार

On: February 8, 2026 11:28 AM
Mumbai water cut
---Advertisement---

Mumbai water cut | मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली असून, शहरातील काही भागांत मंगळवारी तब्बल 14 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचे तातडीचे काम हाती घेतल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आधीच पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पाली हिल जलवाहिनीवर गळती, दुरुस्तीचे काम हाती :

वांद्रे पश्चिम (Bandra West) येथील पाली हिल जलाशयाशी जोडलेल्या 900 मिमी व्यासाच्या आवक जलवाहिनीवर गळती आढळून आली आहे. ही समस्या तातडीने दूर करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) मंगळवारी सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम करणार आहे. या काळात सुमारे 14 तास संबंधित भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित राहणार आहे.

हे काम वांद्रे पश्चिमेतील कुरेशी नगर झोपडपट्टीजवळील म्हाडा (MHADA) च्या मोकळ्या भूखंडातून जाणाऱ्या तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गालगत असलेल्या जलवाहिनीवर करण्यात येणार आहे. या दुरुस्तीमुळे काही भागांत पूर्णपणे पाणी बंद राहील, तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आधीच पाणीसाठा करून सहकार्य करावे, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Mumbai water cut | या परिसरात पूर्ण व कमी दाबाने पाणीपुरवठा :

या दुरुस्ती कामाचा सर्वाधिक परिणाम एच-पश्चिम विभागातील (H-West Ward) नागरिकांवर होणार आहे. वांद्रे पश्चिमेतील हिल रोड, पाली हिल, कार्टर रोड, सेंट अँड्र्यूज मार्ग, पाली गाव, चिंबई, शेर्ली गाव, कांतवाडी, खार दांडा, कोळीवाडा, दांडा पाडा, चुईम गावठाण, खार पश्चिमेतील काही भाग, माउंट मेरी परिसर, के.सी. मार्ग, बाजार रस्ता, पाली माला, कोल डोंगरी आणि नर्गिस दत्त मार्ग या भागांमध्ये मंगळवारी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. (Mumbai water cut)

याशिवाय, हिल रोडच्या टोकापासून ताज लँड्स एन्ड (Taj Lands End), बी.जे. मार्ग, एच.के. भाभा मार्ग, काणे मार्ग आणि गणेश झोपडपट्टी परिसरात मध्यरात्रीनंतर 1 ते पहाटे 4.30 या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. संभाव्य गैरसोय लक्षात घेता नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

News Title: Mumbai Water Supply Shutdown Alert

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now