मुंबई व ठाण्यात ‘इतके’ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

On: December 1, 2024 10:44 AM
Water Cut News
---Advertisement---

Water Cut News l मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आजपासून म्हणजेच 1 डिसेंबरपासून 5 डिसेंबर या कालावधीत पाणीपुरवठ्यात 10 टक्के कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे अवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद राहणार? :

मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे या ठिकाणावरील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड झाला असल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम आजपासून सुरु करण्यात आले आहे. तसेच हे काम 1 आणि 2 डिसेंबर दरम्यान पूर्ण होणार आहे. मात्र या कामामुळे मुंबई शहर व उपनगरांसह ठाणे व भिवंडी महापालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यात 1 ते 5 डिसेंबर या कालावधीत 10 टक्के कपात करण्यात येणार आहे.

पिसे या ठिकाणावरून ठाणे आणि भिवंडीला पाणीपुरवठा केला जातो. तसेच ठाणे आणि भिवंडी येथून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या मुंबईपर्यंत येत आहेत. त्यामुळे या दोन्ही शहरांना पाणीपुरवठ्यातील काही वाटा देखील दिला जातो. त्यामुळे दुरुस्तीच्या कामामुळे या दोन्ही शहरांच्या पाणीपुरवठ्यावर देखील परिणाम होणार आहे.

Water Cut News l किती टक्के पाणी कपात? :

यासंदर्भात दुरुस्तीचे काम देखील दोन दिवस चालणार असले तरी पाणीपुरवठ्यात मात्र 5 दिवस कपात केली जाणार आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी लोअर परळ येथील तानसा जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम देखील हाती घेण्यात आले होते. त्यामुळे अनेक विभागात पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

परंतु आता मुंबईसह ठाणे शहराला पाणी कपात केली जाणार आहे. मात्र ही कपात दहा टक्के असणार आहे.

News Title : Mumbai Water Cut News Today

महत्त्वाच्या बातम्या- 

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर!

जनतेचा कौल 5 महिन्यांत बदलला, आम्ही काय करणार?

2100 रुपये मिळणार की नाही?; इथे करा नवी लिस्ट चेक

आयकर विभागाची मोठी कारवाई, डोळे फिरवणारी रोकड लागली हाताला

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख व ठिकाण ठरलं; कधी होणार?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now