मुंबईकरांनो ‘या’ भागातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणारं!

On: November 27, 2024 10:59 AM
Mumbai Water Cut
---Advertisement---

Mumbai Water Cut l मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. मुंबईतील जी दक्षिण व जी उत्तर या विभागातील जलवाहिनी दुरूस्ती कारणाने पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. त्यामुळे आता 28 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते 29 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 8 वाजेदरम्यान या दोन्ही विभागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे आता नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

Mumbai Water Cut l कोणत्या विभागात पाणीपुरवठा बंद राहणार? :

जी दक्षिण विभाग : करी रोड, महादेव पालव मार्ग, ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ, सखाराम बाळा पवार मार्ग, लोअर परळ परिसर, ना. म. जोशी मार्ग या भागातील पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहणार आहे.

जी दक्षिण विभाग : ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ या भागातील पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहणार आहे.

जी दक्षिण विभाग : पी. बाळू मार्ग, हातिसकर मार्ग, आदर्श नगर, संपूर्ण प्रभादेवी परिसर, जनता वसाहत, अप्पासाहेब मराठे मार्ग, सेनापती बापट मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, वीर सावरकर मार्ग, ना. म. जोशी मार्ग, गणपतराव कदम मार्ग, प्रभादेवी आणि संपूर्ण लोअर परळ स्थानक परिसरातील पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहणार आहे.

जी उत्तर विभाग : सेनापती बापट मार्ग, गोखले मार्ग, काकासाहेब गाडगीळ मार्ग, वीर सावरकर मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग या भागातील पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहणार आहे.

जी उत्तर विभाग : सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, एल. जे. मार्ग, अरूणकुमार वैद्य मार्ग या भागातील पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहणार आहे.

News Title : Mumbai Water Cut News

महत्त्वाच्या बातम्या- 

मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटलांची सर्वात मोठी घोषणा!

आताची सर्वात मोठी बातमी, देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री…

‘शिंदेंसोबत तसं काहीही ठरलं नव्हतं’, दिल्लीतील नेत्याने सगळं सांगूनच टाकलं

फडणवीसांना नाहीतर ‘या’ महिला नेत्याला मुख्यमंत्री करा! कोणी केली मागणी

‘सेक्स लाईफमुळे बाॅलिवूडमध्ये…’; वकीलांनी दिलेल्या माहितीमुळे खळबळ

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now