Mumbai University Senate Election 2024 | मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीचा निकाल काल 27 सप्टेंबररोजी रात्री उशिरा जाहीर झाला. या निवडणुकीत युवसेनाने बाजी मारली आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीच्या 10 पैकी 10 जागांवर युवा सेनेने दणदणीत विजय मिळविला आहे. यातून पुन्हा एकदा विद्यापीठावर आपलाच दबदबा असल्याचं युवा सेनेने दाखवून दिलं आहे. (Mumbai University Senate Election 2024)
ठाकरेंची युवा सेना पहिल्या निकालापासूनच आघाडीवर होती. दहाव्या जागेचा निकाल रात्री साडे अकरा वाजता समोर आला. युवा सेनेने 10 पैकी 9 जागा जिंकल्यानंतर दहावी जागा आपल्या वाट्याला येणार, याबाबत विरोधकांना आशा होती. पण, पदवीधर मतदारांनी युवासेनेच्या बाजूनेच दहाव्या जागेचाही कौल दिला.
युवा सेनेचे किसन सावंत हे विजयी झाले. ही दहावी जागा जिंकल्याने युवासेनेने 2018 च्या मुंबई सिनेट निवडणुकीची पुनरावृत्ती केली. तेव्हा देखील आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात 10 पैकी 10 जागा युवा सेनेने जिंकल्या होत्या. आता 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत सुद्धा युवासेनानेच बाजी मारली आहे. (Mumbai University Senate Election 2024)
‘या’ उमेदवारांनी मारली बाजी
मयूर पांचाळ 5350 मते
स्नेहा गवळी 5914 मते
शीतल शेठ देवरुखकर 5489 मते
धनराज कोहचडे 5247 मते
शशिकांत झोरे 5170 मते
प्रदीप सावंत 1338 पेक्षा जास्त मते
मिलिंद साटम
परम यादव
किसन सावंत
युवासेनेचे प्रदीप सावंत हे खुल्या प्रवर्गातून विजयी झाले.त्यांना पहिल्या पसंतीचे 1338 हून अधिक मते मिळाली.सलग तिसऱ्यांदा विजयी होण्याची हॅट्ट्रीक त्यांनी साधली. या निवडणुकीत युवासेनेला क्लीन स्वीप मिळाली आहे. आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठातील आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे. (Mumbai University Senate Election 2024)
News Title : Mumbai University Senate Election 2024
महत्वाच्या बातम्या –
आज शनीदेव ‘या’ राशीच्या जीवनात धन-सुखाचा पाऊस पाडणार!
मोठी बातमी! खासदार बजरंग सोनवणे अडचणीत
भाजपच्या माजी खासदाराने राष्ट्रवादीच्या नेत्याला केली बेदम मारहाण!
PF चे पैसे काढणार असाल तर ही बातमी नक्की वाचा!
निक्कीच्या आईने अरबाजबद्दलची ‘ती’ गोष्ट सांगताच निक्कीला बसला मोठा धक्का!






