Ajit Pawar Death | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात विमानातील सर्व जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. मुंबईहून अवघ्या 20 ते 25 मिनिटांत बारामती गाठणाऱ्या या अत्याधुनिक विमानाचा अपघात कसा झाला, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. (Ajit Pawar Plane Crash)
अजित पवार हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे निघाले होते. लँडिंगच्या काही क्षण आधी तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून नागरी विमान वाहतूक अधिकाऱ्यांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेने केवळ राजकीय नव्हे तर विमान वाहतूक क्षेत्रातही मोठी खळबळ उडवली आहे.
विमानातू कोण कोण प्रवास करत होते? :
– उपमुख्यमंत्री अजित पवार
– विदीप जाधव
– पिंकी माळी
– कॅप्टन सुमित कपूर
– कॅप्टन शांभवी पाठ
Ajit Pawar Plane Crash | अपघात कसा घडला? :
दरम्यान, अपघातस्थळी बचावकार्य पूर्ण करण्यात आलं असून तांत्रिक बिघाड, हवामान स्थिती किंवा मानवी चूक यापैकी नेमकं कारण काय, याचा तपास सुरू आहे.
अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का बसला असून त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी असल्याची भावना व्यक्त होत आहे.






