‘या’ शहरांमध्ये घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना मोठा धक्का!

On: January 31, 2025 4:49 PM
Budget 2026
---Advertisement---

Home Buying l संसदेत (Parliament) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) देशाचा अर्थसंकल्प (Budget) सादर करण्यासाठी सज्ज झालेल्या असतानाच त्याच्या काही तास आधीच गृहनिर्माण क्षेत्रातील (Housing Sector) एक मोठी आणि लक्षवेधी बातमी समोर आली आहे. मुंबई (Mumbai) आणि ठाण्यातील (Thane) घरांच्या दरांसंदर्भातील नवी आकडेवारी पाहता या दोन्ही शहरांमध्ये घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसू शकतो.

मायानगरी, अनेकांसाठी कर्मभूमी असणाऱ्या मुंबई शहराची व्याप्ती (Scope) मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तिथे ठाणे शहराचाही सर्वांगीण विकास (Overall Development) झाला असून, अनेक खासगी संस्थांनी (Private Companies) ठाण्यानजीकच व्यवसाय संकुले (Business Complexes) उभारत रोजगारसंधी (Job Opportunities) उपलब्ध करून दिल्या आहेत. परिणामी अतिशय वेगाने पुढे जाणाऱ्या या दोन्ही शहरांकडे अनेकांचा ओघ वाढताना दिसतोय. असे असले तरीही या शहरात हक्काच्या घराचा शोध घेणे मात्र दिवसेंदिवस अधिकच कठीण होताना दिसत आहे. यामागे मुख्य कारण ठरतेय ते म्हणजे मुंबई आणि ठाण्यातील घरांचे वाढलेले दर.

मुंबईत घरांच्या किमतीत 18 टक्क्यांची वाढ :

‘रिअल इनसाइट रेसिडेन्शिअल अॅन्युअल राऊंडअप 2024’ (Real Insight Residential Annual Roundup 2024) या अहवालातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार 2024 या वर्षात मुंबई महानगर क्षेत्रामध्ये (Mumbai Metropolitan Area) घरांच्या किमतीत 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशातील एकूण 8 शहरांमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर (October to December) या कालावधीत मालमत्ता दर (Property Rates) मोठ्या फरकाने वाढल्याचे लक्षात आले.

Home Buying l कुठे किती वाढ? :

प्रामुख्याने मुंबई, पुणे (Pune) आणि चेन्नईमध्ये (Chennai) हे दर चढत्या आलेखात दिसून आले. जिथे दिल्ली (Delhi) (गुरुग्राम – Gurugram, नोएडा – Noida, ग्रेटर नोएडा – Greater Noida, गाझियाबाद – Ghaziabad आणि फरीदाबाद – Faridabad) 49 टक्के, मुंबई महानगर क्षेत्र (मुंबई, नवी मुंबई – Navi Mumbai आणि ठाणे) 18 टक्के, पुणे, चेन्नई 16 टक्के आणि बंगळुरू (Bengaluru), कोलकाता (Kolkata), अहमदाबाद (Ahmedabad) इथे अनुक्रमे 12 आणि 10-10 टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट झाले.

मागील दशकभराचा संदर्भ घेतल्यास स्वतःच्या घरासाठी सातत्याने आर्थिक जुळवाजुळव करण्याच्या प्रयत्नांत असणाऱ्यांसाठी मात्र आता आव्हानाचा काळ (Challenging Time) असणार आहे असे म्हणणे गैर ठरणार नाही.

घरांच्या किमती वाढण्याची कारणे :

मागील काही वर्षांमध्ये घरांच्या किमती गगनाला भिडल्याचे (Skyrocketing Prices) पाहायला मिळत आहे. याच कारणास्तव हक्काच्या घराच्या स्वप्नापासून सामान्य माणूस दूर लोटला जात आहे, हेसुद्धा एक दाहक वास्तव. बांधकाम क्षेत्रासाठी लागणाऱ्या साहित्यातील दरवाढ (Increased Material Cost), मोठ्या घरांची वाढती मागणी (Increasing Demand), कामगारांची मजुरी (Labor Wages) यामुळे एकूणच घरांच्या किमतींमध्येही वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. समाजातील अनेक मोठी नावे, बड्या व्यक्ती आणि सेलिब्रिटींनी (Celebrities) मुंबई, ठाण्याला पसंती दिल्याने प्रामुख्याने मुंबई शहर यामध्ये निवासी बाजारपेठेचे केंद्र (Center of Residential Market) असल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे.

येत्या काळात गृहनिर्माण क्षेत्रात फारसे बदल अपेक्षित नसून, घरांच्या किमती कमी होण्यासही वाव मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे आता हक्काच्या घराचे गणित सामान्यांना घाम फोडणार हे खरे!

थोडक्यात, मुंबई आणि ठाण्यातील घरांच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, येत्या काळातही ही वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न आणखी महाग झाले आहे.

News Title: Mumbai-Thane-Housing-Prices-Soar-By-18-Percent-Home-Buying-Dreams-Shattered

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now