‘मुंबई’ पुन्हा टार्गेट ? दहशतवादी हल्ल्याचा कट

On: September 28, 2024 11:27 AM
Mumbai Terrorist Attack
---Advertisement---

Mumbai Terrorist Attack l अवघ्या काही दिवसांत नवरात्रौत्सवाला सुरुवात होत आहे. मुंबईमध्ये नवरात्रौत्सव काळात मोठ्या प्रमाणात गरबा खेळला जातो. तसेच थिठिकाणी गरबा खेळण्यासाठी देखील मोठी गर्दी जमते. मात्र ऐन सणासुदीच्या काळात आता मुंबई हाय अलर्ट मोडवर आल्याची माहिती मिळाली आहे. कारण सेंट्रल एजन्सीकडून मुंबईला अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा कट :

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात आला असून पुन्हा एकदा मुंबईला दहशदवाद्यांकडून टार्गेट केलं जाण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

सणासुदीच्या काळात अनेक लोक घराबाहेर पडतात. या निमित्ताने हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर विभागाकडून मिळाली आहे. तसेच आता हा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई शहरातील सुरक्षा व्यवस्था आता वाढवण्यात आली आहे. याशिवाय महत्त्वाच्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर सुरक्षा तपासणी केली जात आहे.

Mumbai Terrorist Attack l नागरिकांनी सतर्क राहावे :

मुंबईला हायअलर्ट मिळाल्याने गुप्तचर यंत्रणांच्या सूचनांवरून मुंबई शहरातील गर्दीच्या ठिकाणी आणि धार्मिक स्थळांवर मॉक ड्रील देखील केलं जात आहे. याशिवाय रेल्वे स्टेशन, विमानतळ यावर अधिक बारकाईनं लक्ष ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे त्या भागातील सुरक्षा व्यवस्था अलर्ट मोडवर आहे. याशिवाय या सुरक्षेसाठी अॅडव्हान्स टेक्नोलॉजीचा देखील वापर केला जात आहे. या सर्व बाबींवर क्राईम ब्रांच आणि पोलीस एकत्र मिळून काम करत आहेत.

मुंबईला हायअलर्ट देण्यात आला असून सुरक्षा अधिकाऱ्यांनी देखील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांना द्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.

News Title : Mumbai Terrorist Attack

महत्वाच्या बातम्या –

सोने आणि चांदीने उडवली ग्राहकांची झोप; जाणून घ्या आजचा दर

कुंभसह ‘या’ राशींना आज मिळणार शुभवार्ता, वाचा राशीभविष्य!

सोनं-चांदी सुसाट, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ; जाणून घ्या आजचे भाव

महिन्याच्या शेवटी दिलासा! पेट्रोल-डिझेलच्या दरात झाली घसरण?

सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंची बाजी, युवासेनेने उडवला अभाविपचा धुव्वा

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now