मुंबई पुन्हा तुंबली! मुसळधार पावसाने लोकल सेवा मंदावली, जनजीवनही विस्कळीत

On: September 26, 2024 8:36 AM
Mumbai Rain update today 26 september
---Advertisement---

Mumbai Rain | मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबली आहे. मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे नागरिकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.(Mumbai Rain)

मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे विमान सेवा देखील विस्कळीत झाली आहे. दिल्लीकडून मुंबईला येणारे विमानं हैदराबादकडे वळवण्यात आली आहेत.रेल्वे रुळावर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक देखील मंदावली आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. आजही मुंबईला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईत लोकल सेवा खोळंबली

पावसाचा जोर पाहता आज 26 सप्टेंबररोजी मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अतिमुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टीमुळे ठाण्यातील पहिली ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. मुंबईसह, ठाणे, पालघर, पिंपरी-चिंडवड परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (Mumbai Rain)

मुंबईतील वसई विरार नालासोप-यात मुसळधार पाऊस सुरु आहे. वसईतील मुख्य रस्ते हे पाण्याखाली गेले आहेत. वसई पश्चिम अंबाडी रोड, शंभरफुटी रोड, सिक्सिफिट रोड, दिवानमान, समता नगर, चुळणे, वसई पूर्व एवर्षाइन, नवजीवन, वालीव, सातीवली, नालासोपारा पूर्व चंदन नाका, आचोला रोड, नागिनादास पाडा, विजय नगर, नालासोपारा पश्चिम श्रीप्रस्थ, पाटणकरपार्क या परिसरात पाणी साचले आहे.

हवामान विभागाचा आज मुंबईला रेड अलर्ट

भारतीय हवामान खात्याने मुंबईत आज 26 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 8:30 पर्यंत अत्यंत जोरदार पावसाचा अंदाज (रेड अलर्ट) वर्तवला आहे. यामुळे नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी 1916 या क्रमांकावर संपर्क साधावा, असं मुंबई महापालिकेने म्हटलं आहे. (Mumbai Rain)

News Title –  Mumbai Rain update today 26 september 

महत्वाच्या बातम्या-

राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, ‘या’ जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टी जाहीर

आज गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार?, वाचा राशी भविष्य

तर पाडापाडी झाल्यास…; जरांगे पाटलांनी सरकारला दिला थेट इशारा

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अक्षयची हत्या!; ‘या’ खुलाशाने सगळीकडे खळबळ

पोलिसांनी अक्षयचा एन्काऊंटर केलं असेल तर डबल अभिनंदन; शर्मिला ठाकरे असं का म्हणाल्या?

Join WhatsApp Group

Join Now