Mumbai Rain update | मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या भागात मुसळधार पाऊस बरसत आहे. पुण्याला तर पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. पुण्यातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. अजूनही काही ठिकाणी नागरिकांची पाण्यातून सुटका केली जात आहे. पहिल्यांदाच पुण्यात (Mumbai Rain update ) पावसामुळे आर्मीला उतरावे लागले.
मुंबईत देखील पावसाने धुमशान घातले आहे. पावसाचा जोर वाढल्याने अनेक ठिकाणी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर, काही रेल्वे वाहतूक थेट बंद करण्यात आली आहे. आज 26 जुलैरोजी देखील हवामान विभागाने मुंबईसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.
मुंबईला आज पावसाचा रेड अलर्ट
तसेच मुंबई पोलिसांनी देखील नागरिकांना काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत. शक्य झाल्यास घरी थांबा असे पोलिसांनी म्हटले आहे. अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
आयएमडीने आज मुंबईत दिवसभर मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा अंदाज वर्तवला आहे. मुसळधार पावसामुळे शहरात वाहतूक कोंडी, पाणी साचणे आणि सार्वजनिक वाहतुकीला (Mumbai Rain update ) अडथळा येऊ शकतो, त्यामुळे खबरदारी बाळगावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत, काही विमान उड्डाणेही रद्द
तसेच नागरिकांनी आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मदतीसाठी 100 किंवा 112 या क्रमांकवर फोन करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. पावसामुळे मुंबईतील अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तर, 10 विमानांचे मार्ग जवळच्या विमानतळावर वळविण्यात आले. रेल्वे रुळ आणि स्थानकांवर पाणी साचल्याने लोकल सेवा देखील उशीराने धावत आहे.
मुंबईमध्ये गेल्या चोवीस तासांत मुंबई शहरात 44 मिमी, पूर्व उपनगरात 90 मिमी आणि पश्चिम उपनगरात 89 मिमी पावसाची नोंद झाली. रस्त्यांवर पाणी साचल्याने पावसाचे पाणी घरांमध्ये शिरले आहे. यामुळे(Mumbai Rain update ) वाहतूक कोंडी देखील झाली.
News Title – Mumbai Rain update 26 july
महत्त्वाच्या बातम्या-
लाडकी बहीण योजनेनंतर सरकारचं शेतकऱ्यांसाठी मोठं पाऊल; आता थेट..
“..पेक्षा मोठा पश्चाताप कोणताच नाही”; परिणीती चोप्राच्या वैवाहिक आयुष्यात वादळ?
राज्यभरात पावसाचा धुमाकूळ! ‘या’ जिल्ह्यांतील शाळांना 8 दिवस सुट्ट्या जाहीर
“हिंदू महिलांनी फिगर मेन्टेन करणं सोडा, 4 मुलं जन्माला घाला”; प्रेमानंद महाराजांचं वादग्रस्त विधान
“घरातील एकटेपणा खायला उठतो, तो कमी करण्यासाठी मी..”; अभिनेत्री रेखा यांचं मोठं वक्तव्य






