..आता याला काय म्हणावं?, मुंबईत शाळकरी मुलीने रचला स्वतःच्याच लैंगिक अत्याचाराचा बनाव

On: September 30, 2024 10:03 AM
Mumbai News Schoolgirl fakes sexual assault
---Advertisement---

Mumbai News | गेल्या काही दिवसांपासून देशासह महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या विविध घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. अशात भांडुपमध्ये एक विचित्र प्रकार उघड झाला आहे. येथील 15 वर्षांच्या शाळकरी मुलीने स्वतःच्याच अपहरणासह लैंगिक अत्याचाराचा बनाव रचल्याचे समोर आले आहे. (Mumbai News)

दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीने आपल्याच लैंगिक अत्याचाराचा बनाव रचल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील एक अल्पवयीन मुलगी भांडूप येथे तिच्या आई-वडिलांसह राहते. शनिवारी सकाळी ती पावणेसातच्या सुमारास नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी निघाली. दुपारी शाळा सुटून बराच वेळ झाला, पण मुलगी घरी आलीच नाही.

दहावीतल्या मुलीने स्वतःच्याच लैंगिक अत्याचाराचा बनाव रचला

यामुळे मुलीच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. पालकांनी मुलीचे वर्गमित्र आणि शाळेत चौकशी केली. मात्र ती कुठे गेली हे कोणालाच माहिती नव्हतं. घरच्यांनी मुलीचा शोध घेतला असता ती ल्वे स्थानकाच्या बाहेर बसलेली दिसली. यावेळी मुलीला घरच्यांनी अनेक प्रश्न केले.

यावेळी अल्पवयीन मुलीने पालकांसमोर एक धक्कादायक खुलासा केला. तीन जणांनी तिचे अपहरण केले. शाळेतून निघाल्यावर तिला ऑटोरिक्षामध्ये बसवून स्थानकाजवळ नेले. त्यांनी लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला, पण मासिक पाळी आल्याने त्यांनी मला सोडून दिले. असा दावा या मुलीने केला. त्यानंतर पालकांनी लगेच पोलिस ठाण्यात तक्रार केली.या प्रकरणी पॉक्सोअंतर्गंत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (Mumbai News)

मुलीने दिलेलं कारण ऐकून सर्वांनाच धक्का

पोलिसांकडून या प्रकरणी चौकशी करण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र मुलीच्या जबाबात तफावत दिसून आल्याने त्यांना संशय आला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलगी शाळेतून एकटीच रेल्वे स्थानकाच्या दिशेने गेल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांनी त्या मुलीची चौकशी केली. तेव्हा तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला. या मुलीने दिलेले कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

दहावीचे वर्ष असल्याने अभ्यासावर लक्ष दे, असं वारंवार आई सांगायची. मात्र अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्याने आईचा ओरडा बसेल. याच भीतीमुळे आपण हा डाव रचला असल्याचं मुलीने सांगितले. जेव्हा तिच्या कुटुंबीयांना ती रेल्वे स्थानकावर सापडली तेव्हा ती खूप घाबरली आणि तिने लगेचच ही खोटी कहाणी सांगितली, असं या मुलीने म्हटलं आहे. (Mumbai News)

News Title : Mumbai News Schoolgirl fakes sexual assault

महत्वाच्या बातम्या –

राज्यात पुढील 5 दिवस पावसाचे, पाहा कुठे-कुठे बरसणार पाऊस?

“गद्दारांना 50 खोके आणि लाडक्या बहीणींना फक्त 1500 रुपये?”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आनंद दिघेंप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घात करण्याचा डाव होता?, कुणी केला दावा?

आज सोमवारी, महादेव कोणत्या राशीवर कृपादृष्टी ठेवणार?, वाचा राशीभविष्य

मोठी बातमी! आमदाराच्या मुलावर प्राणघातक हल्ला

Join WhatsApp Group

Join Now