मुंबईकरांनो थर्टी फर्स्टला दारू आणि पार्ट्या जरा जपून; अन्यथा…

On: December 31, 2024 9:03 AM
Mumbai News police prepared for new year celebrations
---Advertisement---

Mumbai News | आज 31 डिसेंबर हा 2024 वर्षातील शेवटचा दिवस आहे. या वर्षाला निरोप तर नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आज जगभरात रात्री पार्ट्या केल्या जातात. ठिकठिकाणी याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईमध्येही आज रात्री मोठा जल्लोष केला जाईल.  याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस देखील अलर्ट झाली आहे. थर्टी फर्स्टच्या उत्सवात नागरिकांच्या सुरक्षेचा पूर्ण विचार करून विशेष यंत्रणा अलर्टवर आहे. (Mumbai News)

सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

शहरातील हॉटेल्स, पब्ज, मॉल्स आणि चौपाट्यांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेच्या कारणास्तव 15 हजार पोलीस आणि अंमलदार मुंबईत तैनात करण्यात आले आहेत. तसेच सशस्त्र दल, राज्य राखीव दल, बॉम्बशोधक आणि नाशक पथके, श्वान पथके, दंगल नियंत्रक पथके, शीघ्र कृती दल आणि फोर्सवन या विशेष पथकांवरही सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून ठेवणार नजर

मुंबई पोलीससह विशेष यंत्रणा आज अलर्टवर आहे. शहरभरातील महत्त्वाच्या जागी सीसीटीव्ही कॅमेरे लावून नजर ठेवण्यात येणार आहे. या कॅमेराद्वारे पोलीस सर्व घटनेची त्वरित माहिती मिळवू शकतील आणि त्यानुसार कारवाई करू शकतील. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मुंबई पोलीस सगळीकडे नजर ठेऊन असणार आहे.  (Mumbai News)

सागरी सुरक्षेवर असणार लक्ष

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर चौपाट्यांवरदेखील गर्दी करतात. त्यामुळे येथेही सुरक्षा तैनात करण्यात येणार आहे. पोलिसांनी समुद्रातील गस्तीमध्ये वाढ केली आहे. तसेच भारतीय तटरक्षक दल आणि नौसेनेकडूनही विशेष सागरी सुरक्षा कवच पुरवण्यात येईल.  यामुळे समुद्र किनारी कोणत्याही अप्रिय घटना घडणार नाही याची काळजी घेतली जाईल. (Mumbai News)

किती फौजफाटा तैनात?

नवीन वर्षाच्या उत्सवासाठी जवळपास 15 हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. मुंबई पोलीस दलाकडून वाहतूक विभागासह आठ अपर पोलीस आयुक्त, 29 पोलिस उपआयुक्त, 53 सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह  2 हजार 148 पोलीस अधिकारी आणि 12 हजार 48 पोलीस अंमलदार असा बंदोबस्त असेल.  (Mumbai News)

काय कारवाई होणार?

थर्टीफर्स्टच्या रात्री महिलांच्या छेडछाडीबाबतच्या प्रकरणांमध्ये मुंबई पोलिसांनी विशेष दक्षता घेतली आहे.  शहरात गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिस तैनात करण्यात आले आहेत. तसेच हॉटेल्स, पब्ज, नाइट क्लब, लाऊंज, तसेच फ्लॅट, बंगले, रिसॉर्टवरील पार्ट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी खबऱ्यांचे नेटवर्क सक्रिय करण्यात आलं आहे.  (Mumbai News)

News Title :  Mumbai News police prepared for new year celebrations
महत्त्वाच्या बातम्या-

वर्षाच्या शेवटच्या दिवशी देवी लक्ष्मी या’ राशींवर करणार धनवर्षाव!

मुंबईत हवेचा दर्जा खालावला, नागरिकांच्या आरोग्यासाठी BMC उचलणार कठोर पाऊल

फरार वाल्मिक कराड उज्जैन महाकालच्या दर्शनाला?; ‘ते’ फोटो समोर

मारहाणीचे व्हिडिओ, राजकीय नेत्यांना कॉल; सरपंच हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा

मोठी बातमी! शिंदे गटाच्या खासदाराचा भीषण अपघात

Join WhatsApp Group

Join Now