मुंबईकरांनो सावधान… प्रत्येक श्वासागणिक तुमच्या शरीरात चाललंय विष!, सगळी माहिती नीट वाचा

On: December 27, 2024 7:38 PM
Mumbai News
---Advertisement---

Mumbai: मुंबईकरांनो, सावधान! मुंबईची हवा दिवसेंदिवस खालावत असून, श्वसनाचे विकार असलेल्या नागरिकांसाठी, लहान मुलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि गर्भवती महिलांसाठी ती अत्यंत धोकादायक बनत चालली आहे. धुरक्याच्या या साम्राज्यात श्वास घेणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे झाले आहे!

काय आहे मुंबईच्या हवेत?

मुंबईकरांच्या शरीरात (Mumbai News) नायट्रोजन ऑक्साईड, ओझोन, सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साईड आणि पार्टिक्युलेट यांसारखी विषारी तत्त्वे जात आहेत. या घातक तत्त्वांमुळे श्वसनाचे गंभीर आजार उद्भवू शकतात.

Mumbai News | शहरावर धुरक्याचे साम्राज्य, हवेचा दर्जा चिंताजनक

गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या हवेचा दर्जा सातत्याने खालावत आहे. प्रदूषणाच्या बाबतीत मुंबई, राजधानी नवी दिल्लीशी स्पर्धा करताना दिसत आहे. गुरुवारी दिवसभर शहर आणि उपनगरांमध्ये धुरक्याचे साम्राज्य पसरले होते. हवेचा दर्जा अत्यंत वाईट नोंदविण्यात आला असून बोरिवली, कांदिवली, मालाड, माझगाव आणि नेव्हीनगर या ठिकाणी तर हवेच्या गुणवत्तेने धोक्याची पातळी ओलांडली होती.

तज्ज्ञ म्हणतात, मॉर्निंग वॉक टाळा

सकाळच्या वेळेत हवेत मोठ्या प्रमाणात धूलिकण आणि प्रदूषण असल्याने श्वसनास त्रास होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी नागरिकांना, विशेषतः श्वसनाचे आजार असणाऱ्यांना, काही दिवस वायुप्रदूषणाची पातळी खाली येईपर्यंत मॉर्निंग वॉक थांबविण्याचा सल्ला दिला आहे. या प्रदूषित वातावरणात श्वासावाटे शरीरात जाणारी हवा प्राणवायू ऐवजी विषारी वायूंचे प्रमाण वाढवत आहे. नागरिकांनी घरच्या घरी व्यायाम करावा, शक्य असल्यास योग आणि प्राणायाम करावा, असेही तज्ज्ञांनी सुचवले आहे.

कुठे किती धोका? (हवेचा गुणवत्ता निर्देशांक – AQI)

बोरिवली: २६९
मालाड: २५१
नेव्ही नगर: २२८
कांदिवली: २०७
माझगाव: २०५
देवनार: २००
कुर्ला : १२५
भायखळा: १३०
घाटकोपर: १३१
सायन: १४९

प्रदूषणाची कारणे:

मुंबईतील पायाभूत सुविधा, रहिवासी व व्यावसायिक संकुले, नवे विकास प्रकल्प यांची बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यातून उडणारी धूळ हवेचा दर्जा ढासळण्यास कारणीभूत ठरत आहे. वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धूरांमध्ये अति-अतिसूक्ष्म काजळीसारखे कण असतात, जे एकत्र येऊन वातावरणातील प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरतात.

परिणाम काय?

व्हायरल इन्फेक्शन सोबतच प्रदूषणाची भर पडल्याने लहान मुलांमध्ये छाती जड होणे, श्वसनाचे आजार वाढले आहेत. अनेक मुलांचा खोकला खूप दिवस राहत आहे. वेळीच उपचार न केल्यास न्यूमोनियाचा धोका वाढू शकतो, असा इशारा बाल श्वसनविकार तज्ज्ञ, डॉ. इंदू खोसला यांनी दिला आहे.

काय काळजी घ्याल?

प्रदूषणाच्या दिवसांत शक्यतो घराबाहेर पडणे टाळा.
बाहेर पडल्यास मास्कचा वापर करा.
घरात शक्यतोवर दरवाजे-खिडक्या बंद ठेवा.
एअर प्युरिफायरचा वापर करा.
भरपूर पाणी प्या.
प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक आहार घ्या.

मुंबईची ढासळती हवेची गुणवत्ता हा चिंतेचा विषय बनला आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा या जीवघेण्या हवेपासून बचाव करणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

PMPML बसने प्रवास करणाऱ्या ‘त्या’ प्रवाशांसाठी खूशखबर, आता ही खास सुविधा मिळणार!

आता तुमच्या घराच्या जवळ मिळणार गंगाजल, तेही फक्त ३० रुपयांत!, कसं ते पाहा…

शेकोटी करत असाल तर सावधान, ‘या’ गोष्टी कराल तर दाखल होऊ शकतो गुन्हा!

‘आमच्या परळीत प्राजक्ता ताई…’; सुरेश धसांनी सगळंच सांगितलं

बीडमध्ये गुन्हेगारीचा महापूर! तब्ब्ल ‘इतक्या’ जणांकडे शस्त्र परवाना?

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now