मुंबईकरांनो काळजी घ्या! हवामान विभागाकडून मोठी माहिती समोर

On: July 20, 2024 1:29 PM
Mumbai Rain Update 20 july 
---Advertisement---

Mumbai News | राज्यभरात सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस बरसत आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईला तर पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. रात्रीच्यावेळी सुरु होणाऱ्या पावसाचा जोर (Mumbai News) सकाळच्यावेळी वाढतो.

यामुळे कामावर निघणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. आजही मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसाने रस्ते, रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. कल्याण वरून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या 10 ते 15 मिनिटे तर पश्चिम रेल्वेवरील वाहतूकही 5 ते 10 मिनिटे उशीराने सुरू आहेत.

मुंबईत पावसाचा जोर वाढणार

हवामान विभागाने मुंबईला आज महत्वाचा इशारा दिला आहे. मुंबईत सध्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी दिसत आहे. त्यामुळे पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची (Mumbai News) शक्यता आहे. वसई, विरार, नालासोपाऱ्यात सकाळपासून पाऊस सुरू आहे.

यासोबतच कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरमध्येसुद्धा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरमध्ये रस्ते वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. पुढील काही तास मुंबईत पावसाचा अजून जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट

दरम्यान, विदर्भात देखील पावसाने थैमान घातले आहे. विदर्भात आज सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक भागांत पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने आज ( 20जुलै) नागपूर,गडचिरोली, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

नागपूरमध्ये तर पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. अनेक नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरले आहे. पावसाचा जोर वाढल्याने नागपूरमधील शाळा आणि कॉलेजला (Mumbai News) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज हवामान विभागाने महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांचा रेड अलर्ट दिला आहे. ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, नांदेड, विदर्भातील गडचिरोली, वर्धा, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

News Title :  Mumbai news heavy rainfall update 

महत्त्वाच्या बातम्या-

अजितदादा-शरद पवार पुन्हा एकत्र येणार?, अजित पवार गटातील आमदाराचं सूचक विधान

विधानसभेपूर्वीच अजितदादांना धक्का?, ‘या’ आमदाराने घेतली शरद पवारांची भेट

गुड न्यूज! सोनं तब्बल ‘इतक्या’ हजारांनी घसरलं, चांदीचाही मोठा दिलासा

शनीदेवाच्या कुपेने ‘या’ 3 राशींना मोठा धनलाभ होणार!

विदर्भात पावसाचं थैमान! ‘या’ भागांतील शाळांना सुट्टी जाहीर

Join WhatsApp Group

Join Now