…म्हणून भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला गुरूद्वाऱ्यातून बाहेर काढला!

On: November 15, 2024 5:53 PM
mumbai news
---Advertisement---

Mumbai News | सर्वसामान्यांमध्ये देव, धर्माबाबत जागृती निर्माण करण्यासह शीख धर्माची शिकवण देणाऱ्या गुरूनानक यांची जयंती आज (15 नव्हेंबर) रोजी राज्यात थाटामाटात साजरी करण्यात येत आहे. यावेळी गुरूद्वाऱ्यामध्ये एकत्रीत येऊन त्यांची जयंती साजरी करण्यात येते. दरम्यान, यावेळी ठाण्यातील एका गुरूद्वाऱ्यामधून राजकारणातील एका बड्या नेत्याला बाहेर काढण्यात आलं आहे.

गुरुनानक जयंतीनिमित्त गुरुद्वाऱ्यात गेलेले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्यावर तिथले सेवेकरी चिडल्याचा प्रकार घडला आहे .

काय घडलं?

गुरुनानक जयंती असल्यानं तीनहात (Mumbai News)  नाका परिसरात असलेल्या गुरुद्वाऱ्यात बरीच गर्दी होती. ठाण्याच्या दौऱ्यावर असलेले जे. पी. नड्डा गुरुद्वाऱ्यात पोहोचले. तिथे त्यांनी दर्शन घेतलं. यावेळी नमस्कार केला आणि ते फोटो काढायला उभे राहिले.

दरम्यान, यावेळी जे. पी. नड्डा पक्षाच्या नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांना घेऊन गुरुद्वाऱ्यात पोहोचल्यानं तिथे सुरु असलेल्या कीर्तनात व्यत्यय आला. आणि त्यामुळे गुरुद्वाऱ्यात असलेले सेवेकरी संतापले आणि जे पी नडा यांना बाहेर जाण्यास सांगितलं.

नड्डांमुळे कीर्तनात व्यत्यय

गुरुनानक जयंती असल्यानं गुरुद्वाऱ्यात (Mumbai News) आधीच मोठी गर्दी होती. कीर्तनाचा कार्यक्रम सुरु होता. नड्डा यांच्यासह भाजप नेते मोठ्या संख्येनं आल्यानं कीर्तनात व्यत्यय आला. भाविकांचा खोळंबा झाला. त्यामुळे सेवेकरी संतापले. त्यांनी नड्डा यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगितलं.

News Title : Mumbai new jp nadda to go outside of gurudwara

महत्त्वाच्या बातम्या-

ऐन विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंना मोठा धक्का!

आम्ही हे करु! मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध, राज ठाकरेंकडून मोठ्या घोषणा

“शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा…”; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

‘मुख्यमंत्री होणं माझ्यासाठी..’; CM पदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा सर्वात मोठा खुलासा

राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळणार?, आणखी एक सर्व्हे समोर

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now