महापालिकेच्या निवडणुका कधी होणार? सर्वात महत्त्वाची माहिती समोर

On: December 14, 2024 4:58 PM
Mumbai Municipal Corporation election
---Advertisement---

Mumbai Municipal Corporation election l राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर मुंबईकरांना मुंबई महापालिका निवडणुकांचे वेध लागले आहेत. कारण आता मुंबई महापालिका निवडणुका कधी पार पडणार? असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. मात्र आता पुढील तीन महिने मुंबई महापालिका निवडणुका होण्याची कोणतीही शक्यता नाही.

राज्य निवडणूक आयोगाने दिली माहिती :

यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता महापालिका निवडणुका घेण्यासाठी तीन महिन्याचा वेळ लागणार आहे. त्यामुळे तुर्तास राज्यातील कोणत्याही महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता नसल्याचं राज्य निवडणूक आयोगान म्हंटल आहे.

तसेच या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊतांनी महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता निवडणुका स्वतंत्र लढून कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे असं वक्तव्य देखील संजय राऊतांनी केलं होतं.

Mumbai Municipal Corporation election l महायुती सरकार निवडणुका एकत्र लढवणार :

दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर विजय वडेट्टीवारांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट स्वबळावर असेल तर आम्ही देखील वेगळं लढणार असं महत्वपूर्ण विधान केलं आहे. त्यामुळे आता पुढच्या निवडणुका स्वबळावर लढायच्या की एकत्र याचा निर्णय मात्र शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे घेतील अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली आहे.

याशिवाय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका महायुती सरकार म्हणून एकत्र लढू असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. तसेच विधानसभा निवडणुकींनंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची देखील जोरदार चर्चा सुरु आहे. यामुळे येत्या एप्रिल महिन्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत.

News Title –  Mumbai Municipal Corporation election date

महत्त्वाच्या बातम्या-

एकनाथ शिंदेंना मंत्रिमंडळात घेऊ नका; फडणवीसांकडे ‘या’ नेत्याने केली मागणी

‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मिळणार नुकसान भरपाई

करिश्माने हनीमूनच्या रात्री झालेला शारीरिक त्रासाबद्दल केला गौप्यस्फोट!

उद्या रंगणार भारत-पाकिस्तान महामुकाबला, जाणून घ्या सर्व माहिती

सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी सर्वात मोठी माहिती समोर!

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now