म्हाडाचं घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ भागात मिळणार हक्काचं घर

On: November 5, 2025 3:50 PM
MHADA Pune Lottery
---Advertisement---

MHADA Lottery 2025 | स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईत घर घेणे हे सर्वसामान्य नागरिकाचे आयुष्यभराचे स्वप्न असते. मुंबईत रोज हजारो लोक नोकरी, व्यवसाय आणि स्वप्नांच्या शोधात येतात. पण येथील प्रचंड घरांच्या किंमतीमुळे बहुतांश लोकांना स्वतःचे घर घेणे परवडत नाही. अशावेळी म्हाडा (MHADA) ही संस्था दरवर्षी नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध करून देते. यंदाही म्हाडाने एक भन्नाट योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत मुंबईतील अत्यंत महागड्या भागांमध्ये म्हणजेच दादर, पवई आणि ताडदेव येथे घर खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. (MHADA Lottery 2025)

‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर विक्री :

मिळालेल्या माहितीनुसार म्हाडा या योजनेत एकूण 100 घरांची विक्री करणार आहे. यावेळी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार घरांचे वाटप होणार आहे. विशेष म्हणजे, या घरांपैकी काही घरांचा यापूर्वीच्या सोडतीत समावेश झाला होता, मात्र अर्जदारांकडून प्रतिसाद न मिळाल्याने ती विकली गेली नव्हती.

आता म्हाडाने हीच घरे निवडून थेट विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत. मुंबईतील तुंगा, पवई, दादर (Dadar MHADA Scheme)आणि ताडदेव अशा चकचकीत भागात ही घरे असून, अर्जदारांना आता पुन्हा एकदा हक्काचे घर घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

MHADA Lottery 2025 | घरांची किंमत आणि परवडण्याचा प्रश्न :

म्हाडाची घरे ही खासगी बांधकामदारांच्या तुलनेत कमी किमतीत उपलब्ध असतात, त्यामुळे प्रत्येक सोडतीवेळी हजारो अर्ज येतात. परंतु या योजनेतील घरे मुंबईतील महागड्या भागात असल्यामुळे त्यांची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याचे समजते.

उदाहरणादाखल, 2023 च्या सोडतीत ताडदेव येथील क्रिसेंट रोडवरील घरांची किंमत सुमारे 7 कोटी 57 लाख रुपये होती. नंतर ती किंमत एक ते दीड कोटी रुपयांनी कमी करण्यात आली, तरीही ती सामान्यांना परवडणारी नव्हती. त्यामुळे आता पुन्हा एकदा हा प्रश्न उपस्थित होत आहे की, म्हाडाची ही घरे सर्वसामान्यांना परवडतील का?

मुंबईकरांसाठी मोठी संधी की फक्त श्रीमंतांसाठीच योजना? :

म्हाडाच्या नव्या योजनेमुळे पुन्हा एकदा घर खरेदीच्या आशा निर्माण झाल्या आहेत. मात्र या घरांच्या प्रचंड किंमतींमुळे सामान्य मुंबईकरांना ती स्वप्नवत वाटतात. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर अर्ज करणे सोपे असले तरी कोट्यवधी रुपयांच्या या घरांसाठी आवश्यक आर्थिक क्षमता असणे गरजेचे आहे. त्यामुळे म्हाडाची ही योजना खरोखरच सर्वसामान्यांसाठी आहे की केवळ उच्चभ्रूंसाठी, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

News Title: Mumbai MHADA Lottery 2025: Apply Now to Get a Flat in Dadar, Tardeo, or Powai – Know Price, Eligibility & Details

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now