गुड न्यूज! मुंबईत तब्बल 5000 घरांची लॉटरी निघणार, पण कधी?; वाचा सविस्तर

On: April 28, 2025 7:46 PM
MHADA Lottery 2025
---Advertisement---

Mumbai MHADA | मुंबईकरांसाठी घर खरेदीचा मोठा आनंदाचा क्षण लवकरच येणार आहे. म्हाडा सुमारे 5000 घरांची लॉटरी दिवाळीपूर्वी जाहीर करणार असल्याची घोषणा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील घरांच्या चावींचं वाटप देखील मेमध्ये होणार आहे. (Mumbai MHADA)

दिवाळीपूर्वी म्हाडाची भव्य लॉटरी

मुंबई (Mumbai) मध्ये घराच्या शोधात असणाऱ्यांसाठी म्हाडा (Mhada) एक आनंददायी संधी घेऊन आली आहे. म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, यंदा दिवाळीच्या आधीच 5000 घरांची लॉटरी काढली जाईल. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील काही घरांच्या चाव्यांचे वाटप मे महिन्यात केले जाणार असून, त्यामुळे पुनर्वसनाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना लवकरच आपली घरे मिळणार आहेत.

जयस्वाल यांनी सांगितले की, म्हाडाने (Mhada) या वर्षीच्या अर्थसंकल्पात पुढील वर्षभरात राज्यभरात एकूण 19,497 घरांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये फक्त मुंबईत 5199 घरं बांधली जाणार आहेत. दिवाळीपूर्वी लॉटरीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले असून त्यामुळे अनेकांना त्यांच्या स्वप्नातील घर मिळण्याची संधी मिळणार आहे.

रिक्त घरांच्या विक्रीसाठी विशेष योजना

संजीव जयस्वाल यांनी म्हाडा (Mhada) व सिडकोसह (CIDCO) इतर मंडळांच्या रिक्त घरांविषयी देखील माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मी रुजू झालो तेव्हा साधारण 19 हजार घरं रिक्त होती, मात्र सध्या ही संख्या 12,500 वर आली आहे. मागील काही काळात 7 ते 7.5 हजार घरं विकण्यात यश आले आहे.

रिक्त घरांची तात्काळ विक्री करण्यासाठी डिस्काउंट स्कीम, भाडे तत्त्वावर घरे देण्याच्या योजना राबविल्या जात आहेत. जयस्वाल यांनी स्पष्ट केले की, पुढील एक ते दीड वर्षात 90 टक्के रिक्त घरे विकली जातील. यामुळे घर खरेदीदारांसाठी अधिक संधी उपलब्ध होतील. (Mumbai MHADA)

Title: Mumbai MHADA Lottery 2025, 5000 Homes Before Diwali

 

Join WhatsApp Group

Join Now