मुंबईत घर घेण्याचं स्वप्न होणार साकार; जाणून घ्या कुठे अन् किती घरे असणार?

On: September 10, 2025 5:33 PM
Mumbai MHADA Flats
---Advertisement---

Mumbai MHADA Flats | मुंबईत घर खरेदी करणं सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. घरांच्या आकाशाला भिडलेल्या किंमतींमुळे अनेकांना आपल्या हक्काचं घर घेणं कठीण झालं आहे. मात्र, मुंबईकरांसाठी आता आनंदाची बातमी आहे. म्हाडाने (MHADA) मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी एक मोठी गृहनिर्माण योजना आणली आहे. या योजनेतून परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध होणार असून ती लॉटरीच्या माध्यमातून नागरिकांना मिळतील. (Mumbai MHADA Flats)

मुंबई मंडळाकडून चेंबूरमधील टिळकनगर येथे एक टोलेजंग इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीत एकूण 19 मजले असतील आणि त्यात 144 घरांची सोय केली जाणार आहे. नुकतेच या प्रकल्पाचे भूमिपूजन पार पडले असून पुढील अडीच ते तीन वर्षांत बांधकाम पूर्ण होऊन घरे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.

किती घरं कोणासाठी? :

मिळालेल्या माहितीनुसार, 144 घरांपैकी 74 घरे अल्प उत्पन्न गटासाठी राखीव असतील. या घरांचे क्षेत्रफळ 44.60 चौरस मीटर इतके असेल. तर 70 घरे मध्यम उत्पन्न गटासाठी असतील आणि त्यांचे क्षेत्रफळ 59.60 चौरस मीटर इतके असणार आहे. त्यामुळे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात मुंबईत घर मिळण्याची संधी मिळणार आहे.

यासोबतच या इमारतीमध्ये 5 दुकाने, 165 चौरस फुटांचे सोसायटी ऑफिस, तसेच 670 चौरस फुटांचा जिम आणि इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Mumbai MHADA Flats | सोयीसुविधांनी सज्ज इमारत :

या प्रकल्पात केवळ घरेच नव्हे तर आधुनिक सोयीसुविधांचाही समावेश करण्यात आला आहे. इमारतीमध्ये सोलार पॅनल, गार्डन, जिम आणि पार्किंगची सुविधा उपलब्ध असणार आहे. पार्किंगमध्ये 38 वाहनं उभी करता येतील इतकी जागा असेल. त्यामुळे घरांसोबतच दर्जेदार सोयीसुविधांचा लाभ मिळणार आहे.

यामुळे म्हाडाच्या या गृहनिर्माण योजनेची प्रतीक्षा नागरिक उत्सुकतेने करत आहेत. (Mumbai MHADA Flats)

प्रकल्पाची पार्श्वभूमी :

चेंबूरमधील टिळकनगर भागात म्हाडाचा 1147.90 चौरस मीटरचा मोकळा भूखंड आहे. दोन वर्षांपूर्वी या भूखंडावर परवडणाऱ्या घरांची योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. टर्नकी पद्धतीने हाल्को इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले. आता म्हाडाने पुढील कार्यवाही करून या प्रकल्पाला गती दिली आहे. (Mumbai MHADA Flats)

या इमारतीच्या बांधकामामुळे चेंबूर परिसरातील नागरिकांना हक्काचं घर मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. मुंबईत घर खरेदी करणं हे स्वप्नवत मानलं जातं. मात्र, म्हाडाच्या योजनांमुळे हजारो कुटुंबांना परवडणाऱ्या दरात घरं मिळत असतात. चेंबूरमधील हा प्रकल्पही त्याला अपवाद ठरणार नाही. येत्या काळात या घरांची लॉटरी निघाल्यानंतर अल्प व मध्यम उत्पन्न गटातील अनेक कुटुंबांची घराची स्वप्नं पूर्ण होणार आहेत.

News Title : Mumbai MHADA Flats: 19-storey building in Chembur with 144 homes, details of income groups and facilities revealed

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now