मुंबई महापौरांना पगार किती असतो? आकडा वाचून थक्क व्हालं

On: January 22, 2026 6:54 PM
Mumbai Mayor Salary
---Advertisement---

Mumbai Mayor Salary | मुंबई महानगरपालिका देशातील सर्वांत श्रीमंत महापालिकांपैकी एक मानली जाते. सुमारे 74 हजार कोटींच्या वार्षिक बजेटवर शहराचा कारभार चालतो. त्यामुळे साहजिकच अनेकांना वाटतं की मुंबई महापौरांचा पगारही भरभक्कम असेल. पण प्रत्यक्षात वास्तव याच्या अगदी उलट आहे आणि हा आकडा वाचून अनेकांना धक्का बसतो.

महापौरांना मिळणाऱ्या सुविधा आणि जबाबदाऱ्या :

मुंबई महापौरांना नियमित पगार न देता मानधन दिलं जातं. त्यांचा मूळ मासिक मानधन सुमारे 6 हजार रुपये इतकाच असतो. मात्र विविध भत्ते आणि सुविधांमुळे त्यांचं सरासरी मासिक उत्पन्न साधारण 50 ते 55 हजार रुपयांपर्यंत जातं. वार्षिक उत्पन्न साधारण 6 ते 6.5 लाख रुपयांच्या दरम्यान राहातं. एवढ्या मोठ्या बजेटच्या महापालिकेचा कारभार पाहणाऱ्या महापौरांसाठी ही रक्कम तुलनेने खूपच कमी मानली जाते.

पगार कमी असला तरी महापौरांना अधिकृत निवासस्थान, सरकारी वाहन, ड्रायव्हर आणि कर्मचारी अशा अनेक सुविधा दिल्या जातात. बैठका, कार्यक्रम आणि अधिकृत दौर्‍यांसाठी वेगवेगळे भत्तेही मिळतात. मुंबईचे महापौर हे “शहराचे पहिले नागरिक” मानले जातात आणि शहराच्या सार्वजनिक जीवनात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.

Mumbai Mayor Salary | महसुलावर पालिकेचा संपूर्ण कारभार चालतो :

मुंबईकरांच्या आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, रस्ते, पूल, ड्रेनेज आणि आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेवर असते. मालमत्ता कर, पाणी बिल, विकास शुल्क, जाहिरात कर यांसारख्या विविध स्रोतांतून जमा होणाऱ्या महसुलावर पालिकेचा संपूर्ण कारभार चालतो.

तसेच एवढ्या मोठ्या यंत्रणेचं नेतृत्व करणाऱ्या महापौरांचा पगार मात्र तुलनेने अत्यंत कमी असल्याचं वास्तव समोर येतं.

News Title: Mumbai Mayor Salary: Despite ₹74,000 Crore Budget, Mayor’s Pay Will Shock You

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now