मुंबईचा महापौर कुणाचा? सत्तेच्या खुर्चीसाठी ‘या’ दिवशी होणार फैसला!

On: January 20, 2026 11:53 AM
Mumbai Mayor Election
---Advertisement---

Mumbai Mayor Election | मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून सध्या जोरदार राजकीय रस्सीखेच सुरू आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या शिवसेना शिंदे गटानेही महापौर पदावर दावा सांगितला आहे. त्यामुळे महायुतीतील मित्रपक्षांमध्येच चर्चांना वेग आला असून मुंबईचा महापौर कुणाचा होणार, याकडे राज्यभराचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, महापौर निवडीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री सध्या दावोस दौऱ्यावर असून त्यांच्या परतल्यानंतर या विषयावर निर्णायक बैठक होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांमध्ये या महिन्याच्या अखेरीस अंतिम चर्चा होणार असून त्यानंतर महापौर पदाबाबत स्पष्ट चित्र समोर येईल, असे संकेत मिळत आहेत. (Mumbai Mayor Election)

शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच, बैठकांना वेग :

उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी महापौर पदावर कोणताही वाद नसल्याचे सांगत महायुतीचाच महापौर होईल, असा दावा केला आहे. मात्र, भाजपमधून हे पद मित्रपक्षाला देण्यास विरोध सुरू असल्याची चर्चा आहे. यामुळे मुंबईच्या राजकारणात वातावरण चांगलेच तापले आहे.

आज मंगळवारी शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांमध्ये प्राथमिक बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते सहभागी होणार असून बीएमसी निकालानंतरची ही पहिली औपचारिक चर्चा मानली जात आहे. महापौर पदासह आगामी सत्तासमीकरणांवर यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे. (BJP Shiv Sena alliance)

Mumbai Mayor Election | महापौर निवडीच्या महत्त्वाच्या तारखा :

महापालिका निवडणूक जिंकणाऱ्या नगरसेवकांसाठी 20 जानेवारी रोजी गॅझेट नोटिफिकेशन जाहीर होणार आहे. त्यानंतर 21 आणि 22 जानेवारी रोजी गट म्हणून नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. महापौर पदासाठी आरक्षणाची सोडत 22 जानेवारी रोजी लॉटरी पद्धतीने काढली जाणार आहे. (Mumbai Mayor Election News)

त्यानंतर 31 जानेवारी रोजी महापौर निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्ष मतदानापूर्वीच महापौर कोणत्या पक्षाचा असेल, याचा निर्णय महायुतीत होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर या घडामोडींना अधिक वेग येईल, असे संकेत मिळत आहेत.

News Title: Mumbai Mayor Election Date Announced: Will BJP or Shinde Sena Get the Top Post?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now