Disease l पावसाळ्यात अनेक आजार डोकं वर काढतात. त्यामुळे रुग्णांची संख्या देखील वाढते. अशातच आता मच्छरांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये मलेरीया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईत या आजाराने थैमान घातलं असून रुग्णालयात देखील रुग्णांची संख्या वाढली आहे.
मुंबईत हा आजार मोठ्या प्रमाणात फोफावतोय :
मुंबईमध्ये वाढत्या मच्छरांच्या प्रादुर्भावामुळे मुंबईकर आजारी पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे.कारण सप्टेंबर महिन्यात मलेरीया आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. सप्टेंबर महिन्यात मुंबईत मलेरियाचे तब्बल 1261 रुग्ण आंधळे आहेत. तर डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ही 1456 आहे. मुंबईमधील पावसाचा वाढत जोर ओसरला तरी पावसाळी आजारांची मात्र संख्या कमी झालेली नाही.
त्यामुळे मुंबई शहरात मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. तसेच घर आणि परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा केल्यास डासांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. याशिवाय या आजारांसंदर्भात नागरिकांनी देखील जागरुक असणे गरजेचे आहे. दरम्यान, आता मुंबई महापालिकेकडून ‘भाग मच्छर भाग’ ही विशेष जनजागृती मोहिम देखील राबवली आहे.
Disease l नागरिकांनी काय काळजी घ्यावी :
वाढत्या आजाराचा सामना करण्यासाठी नागरिकांनी आपल्या घराच्या व इमारतीच्या परिसरात कुठेही पाणी साचणार नाही याची पूर्णपणे दक्षता घ्यावी. तसेच साचलेल्या पाण्यातच डासांची मादी अंडी घालत असते. त्यामुळे डासांची उत्पत्तीस्थळे तयार होतं असतात. त्यामुळे घराभोवती साचलेले पाणी आढळल्यास त्याचा तत्काळ निचरा करावा.
याशिवाय टायर, नारळाच्या करवंट्या, झाडांच्या कुंड्या, प्लॅस्टिकच्या बाटल्या व आकण, फ्रीजचा डिफ्रॉस्ट दे यामध्ये देखील पाणी साचून राहणार नाही याची नागरिकांनी दक्षता घ्यावी. तसेच नागरिकांनी दिवसा व रात्री झोपताना मच्छरदाणी किंवा डास प्रतिबंधात्मक औषधांचा वापर आवर्जून करावा.
News Title – Mumbai malaria and dengue patient increased
महत्वाच्या बातम्या-
बिग बॉसकडून सूरज चव्हाणवर अन्याय; आता थेट…
अभिनेता गोविंदाच्या हेल्थबद्दल सर्वात मोठी अपडेट समोर!
दिवाळी गिफ्ट! फक्त 13 हजार रुपये भरा आणि iPhone 16 मिळवा
यादी तयार! रोहित पवार, राजेश टोपेंसह 50 मोठे नेते पाडणार; कोणी दिला इशारा?
मुंबई मेट्रोत नोकरीची सुवर्णसंधी, इच्छुक उमेदवारांनी ‘असा’ करावा अर्ज!






