मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का!

On: April 2, 2025 1:53 PM
Mumbai Indians
---Advertisement---

Mumbai Indians l आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्स संघाची सुरुवात काहीशी निराशाजनक झाली आहे. पहिल्या तीन सामन्यांपैकी दोन सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मिळवलेला एकमेव विजय ही काहीशी दिलासादायक बाब ठरली असली तरी संघातील अडचणी संपलेल्या नाहीत. आता चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे – टीमचा हुकूमाचा एक्का जसप्रीत बुमराह याचे पुनरागमन सध्या अनिश्चित आहे.

बुमराहच्या अनुपस्थितीमुळे गोलंदाजी कमकुवत :

मुंबई इंडियन्ससाठी जसप्रीत बुमराह हा नेहमीच सामना फिरवणारा खेळाडू ठरला आहे. मात्र, IPL 2025 च्या सुरुवातीपासूनच तो संघाबाहेर आहे. बुमराहच्या अनुपस्थितीत मुंबईची गोलंदाजी फारशी प्रभावी ठरत नाहीये. त्यामुळे बुमराह कधी संघात परतेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुरुवातीला असे सांगितले जात होते की, बुमराह 1 एप्रिलपर्यंत संघात सामील होईल, परंतु आता BCCI च्या वैद्यकीय विभागाने त्याला आणखी विश्रांती द्यावी, असा सल्ला दिला आहे. कारण त्याचा वर्कलोड अचानक वाढवल्यास पुन्हा स्ट्रेस फ्रॅक्चर होण्याची शक्यता आहे.

Mumbai Indians l इंग्लंड कसोटी मालिकेची तयारी कारणीभूत? :

IPL 2025 नंतर भारताची इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका होणार आहे. त्यामुळे BCCI आणि टीम मॅनेजमेंट बुमराहच्या फिटनेसबाबत अत्यंत दक्ष आहे. बुमराह सध्या BCCI च्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये सराव करत आहे, पण अजूनही तो पूर्णपणे गती मिळवण्यासाठी झगडतो आहे. त्यामुळे त्याच्या पुनरागमनाची तारीख सध्या निश्चित करण्यात आलेली नाही.

आकाशदीप लवकरच होणार टीममध्ये सामील :

दरम्यान, आणखी एक चांगली बातमी म्हणजे दुसरा गोलंदाज आकाशदीप 10 एप्रिलपर्यंत संघात सामील होऊ शकतो, अशी माहिती मिळत आहे. पण बुमराहच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्सला स्वतःची रणनीती नव्याने ठरवावी लागणार आहे.

मुंबई इंडियन्सला या हंगामात सलामीच्या जोडीचा प्रश्न भेडसावत आहे. रोहित शर्मा तिन्ही सामन्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलेला नाही. त्यामुळे संघाच्या फलंदाजीतही सातत्याचा अभाव दिसून येतो.

जसप्रीत बुमराह संघात केव्हा परतेल हे सध्या निश्चित नसले तरी, एप्रिलच्या मध्यापर्यंत तो उपलब्ध होईल अशी आशा संघ व्यवस्थापनाला आहे. पण तोपर्यंत मुंबई इंडियन्सला बुमराहशिवाय मैदानात उतरण्याची मानसिक तयारी ठेवावी लागणार आहे.

News Title: Mumbai Indians in Trouble: Jasprit Bumrah’s Return in IPL 2025 Still Uncertain

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now