स्पीड बोट प्रवासी बोटीला कशी धडकली? घटनेचा व्हिडिओ समोर

On: December 19, 2024 11:07 AM
Mumbai to Malvan
---Advertisement---

Mumbai Boat Capsized l मुंबईमध्ये काल एक दुर्दैवी घटना घडली आहे. दक्षिण मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथील समुद्रात एक प्रवासी बोट उलटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी एका स्पीडबोटने टक्कर दिल्याने प्रवाशी बोट बुडाली आहे. मात्र अशातच आता त्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

स्पीड बोट नेमकी कशी धडकली? :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, अथांग सागर पसरलेला असताना देखील स्पीड बोट प्रवासी बोटीला कशी धडकली? तसेच हा अपघात नेमका कसा घडला? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मात्र यावेळी एका प्रत्यक्षदर्शीने या अपघाताचा शूट केलेला व्हिडिओ देखील समोर आला आहे. मात्र त्यावरुन हा अपघात किती धक्कादायक होता हे दिसत आहे.

तसेच एलिफंटाला चाललेल्या नीलकमल या प्रवासी बोटीला स्पीड बोट नेमकी कशी धडकली. तसेच ही स्पीड बोट नौदलाची होती. मात्र नौदलाकडून हा अपघात नेमका कशामुळे झाला? त्याबद्दल स्पष्टीकरण देखील देण्यात आलं आहे.

Mumbai Boat Capsized l भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर :

नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, काल मुंबई बंदरात स्पीड बोटीच्या इंजिनची चाचणी सुरु होती. मात्र त्यावेळी इंजिनमध्ये अचानकपणे बिघाड झाल्याने स्पीड बोटीच नियंत्रण सुटलं व स्पीड बोट ही नीलकमल बोटीला येऊन जोरात धडकली. मात्र आता या अपघाताचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

त्यामध्ये दिसत आहे की, स्पीड बोट नील कमल बोटीपासून अवघ्या काही अंतरावर समुद्रात राऊंड मारताना दिसत आहे. मात्र हा व्हिडिओ पाहताना वाटत आहे की या बोटचा अशाप्रकारे भीषण अपघात होईल. परंतु, स्पीड बोट टर्न झाल्यानंतर नीलकमल बोटीच्या दिशेने येताना बोट पूर्णपणे अनियंत्रित झाली व नीलकमल बोटीला जाऊन धडकली. मात्र या अपघातात एकूण 13 जणांचा मृत्यू देखील झाला आहे.

News Title – Mumbai Boat Capsized Video 

महत्त्वाच्या बातम्या-

“माझी नातवंडं टाहो फोडून रडतायत, तिघांनी शब्द दिला…”; मंत्रीपदावरून शिवतारे संतापले

वर्षाच्या शेवटी सोन्याची आनंदवार्ता, ‘इतक्या’ रुपयांनी घसरले भाव

निवडणूक होताच प्रवाशांना पहिला झटका, लालपरीचा प्रवास महागणार?

आज गुरुवारी, देवी लक्ष्मी ‘या’ 3 राशींवर करणार धन व सुखाचा वर्षाव!

राधिका आपटेचे प्रेग्नंसीचे नको तसले फोटो व्हायरल!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now