Accident l राज्यात गेल्या काही महिन्यांपासून हिट अँड रनच्या अनेक घटना घडत आहेत. यामध्ये अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच आज राज्यात गणेशोत्सवाचे वातावरण पसरले आहे. मात्र मुंबईत एक धक्कादायकघटना घडली आहे. मुलुंडमध्ये आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास एका भरधाव वेगाने आलेल्या बीएमडबल्यू कारने रस्त्यावर बॅनर लावणाऱ्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना चिरडल्याची घडली आहे.
मुंबईत गणेशोत्सवाला गालबोट :
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, मुंबईमधील मुलुंडमध्ये आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास एका भरधाव वेगाने आलेल्या बीएमडबल्यू कारने रस्त्यावर बॅनर लावणाऱ्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये एकजणांचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण मुंबई हादरली झाली आहे.
यावेळी दोघांना कारने चिरडल्यानंतर कारचालकाने पळ काढला. मात्र घटनेवेळी जखमींना मदत मिळाली असती तर त्या तरुणाचे प्राण वाचू शकले असते, मात्र अपघातास कारणीभूत ठरलेला कारचालक तेथून ताबडतोब फरार झाला आहे.
Accident l एकजणाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी :
या घटनेतील तरुणांचे नाव प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील आहे. तर प्रीतम थोरात या इसमाचा मृत्यू झाला असून प्रसाद पाटीलची प्रकृती गंभीर आहे. पहाटेच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे मुलुंडमध्ये शोककळा पसरली आहे.
तसेच या घटनेची माहिती मिळताच मुलुंड पोलीस तेथे दाखल झाले. तर आता पोलीस फरार कारचालकाचा कसून शोध घेण्यात येत आहे. याशिवाय जखमी तरुणावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती सध्या गंभीर असल्याचे समजत आहे. मात्र या घटनेमुळे गणेशोत्सवाला गालबोट लागलं आहे.
News Title : Mulund BMW Accident
महत्वाच्या बातम्या-
पुण्यातील ‘या’ भागात 10 दिवस दारू बंदी!…तर असं केल्यास कारवाई होणार
पावसाच्या सरींनी होणार गणरायाचं स्वागत; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी
बाप्पाचे आगमन होताच सोने-चांदीचे दर कडाडले; जाणून घ्या आजचे दर
खुशखबर! कोट्यवधी तरुणांना बँकेत मिळणार नोकरी, जाणून घ्या सविस्तर
बाप्पाच्या प्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त कोणता?, जाणून घ्या पूजेला लागणारे साहित्य व मंत्र






