… तर मग नव्या मंत्र्यांनी काय करायचं?; शिंदे गटाच्या आमदाराचा संतप्त सवाल

On: December 19, 2024 2:43 PM
MLA Chandrakant Patil
---Advertisement---

Chandrakant Patil l राज्यात मंत्रिमंडळ विस्तारावरून महायुतीचे अनेक नेते नाराज असल्याचं चित्र दिसत आहे. कारण मंत्रिमंडळ विस्तारामधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांना डावलण्यात आले आहे. यानंतर छगन भुजबळ यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. मात्र त्यांच्या या नाराजीवर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

प्रत्येकाला वाटतं मीच आजन्म मंत्री असावा :

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना छगन भुजबळ यांच्या नाराजीबद्दल प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट विधान केलं आहे. प्रत्येकाला वाटतं मीच आजन्म मंत्री असावा, तर मग नव्या मंत्र्यांनी काय करायचं? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितीत केला आहे.

दरम्यान, छगन भुजबळ यांची नाराजी हा त्यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय आहे. प्रत्येकाला असं वाटतंय की, मी आजन्म मंत्री असावा मग नवीन येणाऱ्यांनी काय करायचं? तसेच या गोष्टींमुळे नवीन येणाऱ्या आमदारांनी सत्ता घ्यायची नाही का? असा सवाल देखील मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Chandrakant Patil l भुजबळांना काय वाटतं हे मला तरी माहित नाही :

आमदार चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, आजचा कार्यकर्ता हा उद्याचा राज्यकर्ता होईल हे जे म्हटलं जातं हे पूर्णपणे खोटं आहे का? कारण त्यामुळेच नवीन लोकांना देखील संधी देऊन त्यांचे देखील व्हिजन त्यांच्या विकासाचा मुद्दा आहे, मात्र यावर नक्कीच काम झाले पाहिजे. तसेच सध्या ही सर्व समाजाची आणि कार्यकर्त्यांची मोठी मागणी आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांना काय वाटतं हे मला तरी माहित नाही.

परंतु, जर प्रत्येकाला असं वाटतंय की मी आजन्म मंत्री असावे. तर मग नवीन येणाऱ्या आमदारांनी काय करायचं अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या मनातील खदखद स्पष्टपणे बोलून दाखवली आहे.

News Title –  Muktainagar MLA Chandrakant Patil comment on Chhagan Bhujbal

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची मागणी

31 ची पार्टी करा आलीशान क्रूझवर, IRCTC चे स्पेशल ‘क्रूझ टूर पॅकेज’कसं बुक कराल?

जम्मू-काश्मीरमध्ये धक्कादायक घटना घडली!

स्पीड बोट प्रवासी बोटीला कशी धडकली? घटनेचा व्हिडिओ समोर

“माझी नातवंडं टाहो फोडून रडतायत, तिघांनी शब्द दिला…”; मंत्रीपदावरून शिवतारे संतापले

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now