शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण योजनेची केली घोषणा

On: December 25, 2024 12:17 PM
Maharashtra
---Advertisement---

Maharashtra l राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असतात. अशातच आता नव्या वर्षात शेतकऱ्यांना सरकारकडून एक मोठी भेट दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ची घोषणा केली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज मिळणार? :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सौर कृषी वाहिनी योजना सुरु केल्यास महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती निर्माण करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका देखील निभावू शकतात. तसेच या महत्वपूर्ण योजनेचा उद्देष राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज उपलब्ध करुन देण्याचा असणार आहे.

याशिवाय या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी निरंतर सौर उर्जा देखील मिळणार आहे. तसेच राज्यात सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांसाठी तब्बल16,000 मेगावॅट वीज देखील देण्यात येते. मात्र गेल्या दोन वर्षात सर्व फीडर सौर उर्जेत बदलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं फडणवीस यांनी म्हंटल आहे.

Maharashtra l कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल होणार :

दरम्यान, सौर कृषी प्रकल्पांचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले आहे. यामध्ये मुख्य सचिव सुजाता सौनिक, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला आणि इतर अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी देखील उपस्थित होते.

तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सौरऊर्जेचा वापर करण्यात अग्रेसर बनवण्याच्या दिशेने प्रयत्न करत असल्याचं देखील यामधून स्पष्ट होत आहे.

News Title – Mukhyamantri Solar Agriculture Feeder Project 2.0

महत्त्वाच्या बातम्या-

“संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं”; नवीन खुलासा समोर

“1500 रुपये देण्यासाठी बहीणींच्या नवरे व भावांना बेवडे बनवणार”; ‘या’ नेत्याचा हल्लाबोल

लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार का? आदिती तटकरेंनी दिलं उत्तर

“20-22 वर्षांची पोरं हवेत गोळीबार करतात, ‘गँग्स ऑफ बीड’चे धनी कोण?”

2100 की 1500?, येत्या चार दिवसात खात्यात येणार पैसे; महिलांनो ‘असं’ करा चेक

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now