मुलीच्या लग्नासाठी सरकार देणार पैसे, ‘कन्यादान योजना’ आहे तरी काय?

On: September 10, 2024 6:57 PM
Kanyadan yojana
---Advertisement---

Kanyadan yojana | लग्नासारखा आनंदी क्षण हा कुण्या कुटुंबाला भार वाटू नये यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘कन्यादान योजना’ आणली. गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकाकडून ‘कन्यादान योजना’ राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या पालकांना मुलीच्या विवाहाप्रसंगी आर्थिक मत दिली जाते.

Kanyadan yojana‘ आहे तरी काय?

समाजातील मागासवर्गीयांचे विवाह वाढत्‍या महागाईत कमी खर्चात व्‍हावे व मागासवर्गीय कुटुंबांचे विवाहावर होणाऱ्या अनाठाई खर्चावर नियंत्रण रहावे यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करणाऱ्या  स्वयंसेवी संस्‍थांना प्रोत्‍साहन देण्‍यासाठी सदर योजना महाराष्‍ट्र शासनाने सुरु केलेली आहे.

या योजनेच्या माध्यमातून नव विवाहित दाम्पत्याला 20000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत वधूच आई-वडील किंवा पालकांच्या नावे मंजूर केली जाते. मात्र त्यासाठी आर्थकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळे सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन विवाह करणं बंधनकारक आहे. अशा प्रकारचा विवाहसोहळा आयोजित करणाऱ्या संस्था किंवा संघटनांना प्रत्येक जोडप्यामागे 4000 रुपये दिले जातात.

योजनेसाठी पात्रता व निकष काय?

  • नवदाम्पत्‍यातील वधू/वर यापैकी दोन्ही किंवा एक जण हे अनुसूचित जाती (नवबौद्धासह) असावा, विमुक्‍त जाती भटक्‍या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील असावा.
  • दाम्पत्‍यापैकी वराचे वय 21 वर्ष व वधूचे वय 18 वर्षापेक्षा कमी असू नये.
  • वधू-वर यांच्‍या प्रथम विवाहासाठीच हे अनुदान अनुज्ञेय असेल.
  • बाल विवाह प्रतिबंध कायदा व हुंडा प्रतिबंध कायद्यांतर्गत असलेल्‍या कोणत्‍याही कलमाचा भंग या दाम्पत्य किंवा कुटूंब यांच्याकडून झालेला नसावा. याबाबत लेखी प्रतिज्ञापत्र सादर कराणे आवश्‍यक आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या- 

जगभरात BCCIची नाचक्की! वॉशरूमच्या पाण्यापासून बनवलं जेवण?

महायुतीला झटका देणारं सर्वेक्षण समोर!

देशाचा गृहमंत्री असताना काश्मीरला जाताना माझी XXX’, सुशीलकुमार शिंदे यांचं धक्कादायक वक्तव्य

मी शहीद होण्यास तयार; मनोज जरांगेंच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ

ग्लॅमरस विश्वातील धक्कादायक सत्य समोर; दिया मिर्झाचा मोठा खुलासा

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now