एसटी महामंडळातील भरतीबाबत प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा!

On: September 20, 2025 3:01 PM
Pratap Sarnaik
---Advertisement---

Pratap Sarnaik | एसटी महामंडळाने १७,४५० कंत्राटी पदांसाठी भरती करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील हजारो तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे.

एसटी महामंडळात १७,४५० पदांवर भरती

एसटी महामंडळाच्या ३०० व्या कंत्राटी बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यात चालक (Driver) आणि सहाय्यक (Helper) अशा पदांसाठी भरती होणार आहे. ज्या उमेदवारांची निवड होईल, त्यांच्यासोबत तीन वर्षांचा करार केला जाईल.

एसटी महामंडळ या सर्व उमेदवारांना कामावर रुजू होण्यापूर्वी पूर्ण प्रशिक्षण देणार आहे, जेणेकरून ते जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडू शकतील. या भरतीमुळे एसटी सेवा सुरळीत ठेवण्यास मदत होईल, विशेषतः दरवर्षी येणाऱ्या नवीन इलेक्ट्रिक बसेसच्या पार्श्वभूमीवर मनुष्यबळाची गरज पूर्ण होईल.

कसा करणार अर्ज आणि किती पगार?

एसटीतील या कंत्राटी मनुष्यबळ भरतीसाठीची निविदा प्रक्रिया येत्या २ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ही ई-निविदा प्रक्रिया सहा प्रादेशिक विभागांनुसार राबवली जाईल.

या कंत्राटी नोकरीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दर महिन्याला कमीत कमी ३० हजार रुपये वेतन मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक बेरोजगार तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे.

News Title- MSRTC to Recruit 17,450 Contractual Employees, Announces Minister

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now