एसटीच्या तिकीटांमधील सवलत महिलांना महागात पडण्याची भीती, धक्कादायक बातमी समोर

On: April 26, 2025 12:43 PM
MSRTC Fare Hike Cancelled
---Advertisement---

MSRTC  | राज्य शासनाने (State Government) महिलांसाठी एसटी (MSRTC) प्रवासात ५० टक्के सवलत जाहीर केल्याने महिला प्रवासी संख्या वाढली आहे. मात्र, पुणे (Pune) शहरातील स्वारगेट (Swargate), शिवाजीनगर (Shivajinagar) यांसारख्या प्रमुख स्थानकांवर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चोरी, विनयभंग आणि बलात्काराच्या घटनांमुळे ही सवलत धोक्याची ठरत आहे.

प्रवासी संख्या वाढली, सुरक्षा रामभरोसे?

महिलांना प्रवासात ५०% सवलत देण्याच्या राज्य सरकारच्या (State Government) निर्णयामुळे एसटीने (MSRTC – Maharashtra State Road Transport Corporation) प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय वाढली आहे. राज्यभरात दररोज सरासरी ५० हजार महिला प्रवासी वाढले आहेत. मात्र, वाढत्या गर्दीसोबतच महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनला आहे.

पुणे शहरातील स्वारगेट (Swargate) आणि शिवाजीनगर (Shivajinagar) ही स्थानके राज्यभरात आणि शहरात ये-जा करणाऱ्या बसेसमुळे कायम गर्दीने भरलेली असतात. या गर्दीचा फायदा घेत चोरटे महिलांचे मोबाईल, पर्स आणि दागिने लंपास करत आहेत. गुरुवारीच स्वारगेट स्थानकात एका महिलेचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली.

चोरीसह बलात्काराच्या घटनांनी चिंता वाढवली

केवळ चोरीच नव्हे, तर विनयभंग आणि अगदी बलात्कारासारख्या गंभीर घटनाही बसस्थानक परिसरात घडल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने महिलांच्या, विशेषतः एकट्या प्रवास करणाऱ्या किंवा मुलांसोबत असणाऱ्या महिलांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे गुन्हेगारांचे फावत आहे.

स्वारगेट (Swargate) आगार व्यवस्थापक सचिन शिंदे (Sachin Shinde) यांनी स्थानकावर सुरक्षा असल्याचे म्हटले असले, तरी गर्दीचा गैरफायदा घेऊन चोऱ्या होत असल्याचे त्यांनी मान्य केले. महिलांनी महागडे दागिने घालून प्रवास करू नये, असा सल्ला त्यांनी दिला. मात्र, उपलब्ध २२ सीसीटीव्ही कॅमेरेही गर्दीच्या तुलनेत अपुरे असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Title : MSRTC Concession Raises Women’s Safety Concerns Pune

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now