दिवाळीपूर्वी प्रवाशांना मोठा झटका! एसटीचा प्रवास ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढला

On: October 1, 2025 4:06 PM
MSRTC Bus Fare Increase
---Advertisement---

MSRTC Bus Fare Increase | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC), ऐन दिवाळी मध्ये एस टी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांना याचा फटका बसणार असून, एसटीच्या भाड्यामध्ये १०% तात्पुरती वाढ करण्यात आली आहे.

महामंडळाच्या तिजोरीत भर :

प्रवाशांचा वाढता ओघ आणि या काळात वाढणारा महसूल लक्षात घेता महामंडळाच्या तिजोरीत भर पडावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ही भाडेवाढ एका विशिष्ट कालावधीसाठी लागू असणार आहे. ऐण सणासुदीच्या काळात राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसमान्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. (MSRTC Bus Fare Increase)

दिवाळी काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे मुंबई पुणे यांसारख्या मोठ्या शहरांतून नोकरी-कामासाठी आलेले प्रवासी आपल्या गावी परतण्याची तयारी करत आहेत. मात्र, नेमक्या याच गर्दीच्या काळात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) भाडेवाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता ऐन दिवाळीत एसटीचा प्रवास महागडा होणार आहे.

‘या’ बसेसना लागू नाही :

प्रवाशांना थोडासा दिलासा देणारी गोष्ट म्हणजे, महामंडळाच्या वातानुकूलित (AC) शिवनेरी आणि शिवाई या दोन बसेसच्या श्रेणींना ही १०% भाडेवाढ लागू नसेल. या श्रेणी वगळता, महामंडळाच्या इतर सर्व बसेससाठी दरवाढ लागू करण्यात आली आहे.

महामंडळाने जाहीर केल्यानुसार ही १० टक्के भाडेवाढ १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीसाठी लागू असेल. साधारणपणे दिवाळीच्या सुट्ट्यांचा आणि प्रवाशांच्या गर्दीचा कालावधी लक्षात घेऊन ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही या काळात गावी जाण्याचा किंवा पर्यटनाचा विचार करत असाल तर तुम्हाला तिकीट खरेदीसाठी आता जास्त पैसे मोजावे लागतील.

भाडेवाढ कधी कधीपर्यंत असेल लागू? :

दिवाळीचा काळात राज्यभरातील चाकरमानी आणि शालेय सुट्ट्यांमुळे पर्यटनाला निघालेले अनेक कुटुंबे प्रवास करतात. बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी उसळते आणि बसमध्ये सीट मिळवण्यासाठी लोकांची अक्षरश: झुंबड उडते.

प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी सुरक्षितपणे आणि वेळेत पोहोचवता यावे या काळात एसटी महामंडळाकडून पूर्ण ताकदीने अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. प्रवाशांना जास्त पैसे मोजावे लागणार असले तरी दिवाळीच्या सुट्टीत एसटी महामंडळाची सेवा महत्त्वाची भूमिका बजावते.

News title : MSRTC Bus Fare Increase

Join WhatsApp Group

Join Now