धोनी… तू खरंच ग्रेट! या VIDEO मुळे चाहते पुन्हा पडले ‘कॅप्टन कूल’च्या प्रेमात!

On: April 17, 2025 10:39 AM
MS dhoni
---Advertisement---

MS Dhoni l महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा त्याच्या शांत, संयमी आणि प्रेमळ स्वभावामुळे चर्चेत आला आहे. एकीकडे IPL 2025 मध्ये धमाकेदार सामने होत असतानाच धोनीने मैदानाबाहेरही चाहत्यांच्या मनात पुन्हा ‘कॅप्टन कूल’ म्हणून आपलं स्थान पक्कं केलं आहे.

अलीकडे लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात 11 चेंडूत 26 धावा करत संघाला विजय मिळवून देणाऱ्या धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे चाहत्यांचे डोळे पाणावले आहेत.

MS Dhoni l काय आहे व्हिडिओमध्ये? :

धोनी एका विमानतळावरून जात असताना त्याची नजर एका व्हीलचेअरवर बसलेल्या महिलेकडे जाते. ही महिला धोनीसोबत सेल्फीसाठी वाट पाहत होती. हे पाहताच धोनी स्वतः तिच्याजवळ जातो, तिचा मोबाईल घेतो आणि प्रेमळपणे स्वतः सेल्फी क्लिक करतो. हा व्हिडिओ पाहून नेटिझन्सने अक्षरशः धोनीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

खेळात धोनीची जादू अजूनही कायम आहे. IPL 2025 मध्ये तो CSK कडून शानदार कामगिरी करत आहे. निवृत्तीच्या चर्चांदरम्यानही त्याची मैदानावरील एनर्जी आणि मैदानाबाहेरील नम्रता, यामुळे तो फक्त खेळाडू नव्हे, तर एक ‘भावनिक नायक’ बनून राहिला आहे.

News Title: MS Dhoni Wins Hearts Again With Kind Gesture for Fan in Wheelchair – Watch Viral Video

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now