Ms Dhoni l चेन्नई सुपर किंग्जसाठी (CSK) आयपीएल 2025 हंगाम अजूनही निराशाजनक ठरत आहे. शुक्रवारी (25 एप्रिल) चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (CSK vs SRH) 5 विकेटने पराभव पत्करावा लागला. या पराभवाने चेन्नईच्या प्लेऑफच्या आशांनाही मोठा धक्का बसला आहे. सामन्यानंतर संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) आपल्या फलंदाजांवर थेट नाराजी व्यक्त केली.
धोनीच्या मते, संघाने पहिल्या डावात १५-२० धावा कमी केल्या. चेन्नईने प्रथम फलंदाजी करत १५४ धावा केल्या होत्या. परंतु सनरायझर्सने १८.४ षटकांत १५५ धावा करत सामना सहज जिंकला.
धोनीने फलंदाजांवर साधला निशाणा :
सामन्यानंतरच्या सादरीकरणात धोनी (MS Dhoni) म्हणाला, “मला वाटतं आम्ही सतत विकेट गमावत राहिलो. पहिल्या डावात खेळपट्टी फारशी वाईट नव्हती. हो, काही षटकांनंतर थोडा बदल झाला, पण असं काही नव्हतं ज्यामुळे १५४ धावा अपुर्या वाटाव्यात. आम्ही चांगली फलंदाजी केली असती, तर १५-२० धावा अधिक करता आल्या असत्या.”
१३ व्या षटकात चेन्नईची स्थिती ४ बाद ११४ अशी होती. मात्र, त्यानंतर अवघ्या ४० धावांत उर्वरित सहा विकेट्स गमावण्यात आल्या. यामुळे संघाला मोठा फटका बसला आणि अखेर पराभवाला सामोरे जावे लागले.
Ms Dhoni l चेन्नई सुपर किंग्जचा सातवा पराभव :
या पराभवासह चेन्नईचा (CSK) आयपीएल 2025 मधील सातवा पराभव नोंदवला गेला आहे. सनरायझर्स हैदराबादने चेपॉक स्टेडियमवर प्रथमच विजय मिळवला आहे. आता चेन्नईच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळजवळ संपुष्टात आल्या आहेत.






