Dhoni Fan Girl Angry l आयपीएल 2025 मधील चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनी बाद झाल्यानंतर एका तरुणीने दिलेल्या रिअॅक्शनने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. तिचा चेहरा रागाने लाल झाला असून, तिने दिलेली प्रतिक्रिया पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
धोनी फलंदाजीसाठी मैदानात उतरला आणि काही आकर्षक फटके मारल्यानंतर संदीप शर्माच्या गोलंदाजीवर शिमरॉन हेटमायरने डीप मिड-विकेटवर शानदार झेल घेतला. हेटमायरचा कॅच घेताच स्टेडियममध्ये एकदम शांतता पसरली. गुवाहाटीच्या या सामन्याला राजस्थानचे होम ग्राउंड असले तरी धोनीसाठी चाहत्यांची मोठी उपस्थिती होती.
सोशल मीडियावर रिअॅक्शनचा कहर :
धोनीच्या आउट झाल्यानंतर एका महिला चाहतीने दिलेल्या रिअॅक्शनचा व्हिडीओ काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. ती तरुणी रागाने दात आवळत, मुठ घट्ट बंद करत हातवारे करताना दिसली. तिच्या चेहऱ्यावर एकाच वेळी राग, दु:ख आणि निराशा दिसून येत होती.
हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. “हेटमायर समोर असता तर काय केलं असतं या तरुणीने?” असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. काहींनी तर तिच्या प्रतिक्रियेला ‘धोनीच्या फॅनची खरी भावना’ असं म्हटलं आहे. एकंदरीत या व्हिडीओने इंटरनेटवर ट्रेंड पकडला आहे.
When Hetmyer Took a catch of MS Dhoni
Samne hota to Socho kya hota ????#CSKvRR #CSKvsRR #RRvCSK
— ANKITA KUMARI (@ankitajkhs) March 31, 2025
Dhoni Fan Girl Angry l सामना गमावल्यानं चेन्नईवर दडपण :
या सामन्यात चेन्नईला शेवटच्या षटकात 20 धावांची गरज होती. धोनी जोवर मैदानात होता, तोपर्यंत चाहत्यांना विजयाची आशा होती. मात्र तो 10 चेंडूंमध्ये 16 धावा करून झेलबाद झाला आणि चेन्नई 6 धावांनी पराभूत झाली. त्याचा हा पराभव सलग दुसरा होता.
पहिला सामना जिंकल्यानंतर चेन्नईने सलग रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे संघावर आता दडपण वाढले असून, पुढील सामन्यात धोनीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा सर्व चाहत्यांना आहे.






