MS Dhoni ची सिनेसृष्टीत एन्ट्री? करण जोहरने व्हिडीओ शेअर करत दिली माहिती!

On: April 16, 2025 12:45 PM
MS Dhoni
---Advertisement---

MS Dhoni | भारतीय क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आजस कोण ओळखत नाही असे नाही. त्याचे लाखो चाहते आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा हा कॅप्टन आता मनोरंजन क्षेत्रातही दमदार एंट्री करत आहे. सध्या तो दक्षिणात्य चित्रपट निर्मितीमध्ये सक्रिय असून त्याचे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस काही प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. पण नुकतीच त्याची एक झलक बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते करण जोहरने (Karan Johar) सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

करण जोहरने शेअर केला व्हिडिओ 

करण जोहरने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये धोनी एका प्रेमळ पात्रात दिसून येतो. व्हिडिओमध्ये धोनी एका रोमँटिक (Romantic Look) संवादासह झळकत आहे. “तू सोबत असतेस तेव्हा प्रत्येक प्रवास सुंदर बनतो,” असं तो म्हणताना दिसतो, आणि त्या क्षणी क्लिप संपते. ही छोटीशी झलक पाहून चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली असून, धोनी खरोखर चित्रपटात झळकणार का, यावर चर्चा सुरू झाली आहे.

या व्हिडिओनंतर (Viral Video) सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला आहे. काहींनी धोनीच्या अभिनयाचे स्वागत करत त्याला ‘आमचा नवीन लव्हर बॉय…’ असे म्हटले आहे. तर काही युजर्सनी त्याच्या या भूमिकेची खिल्ली उडवली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

दरम्यान, या पूर्वी धोनीने करण जोहरसोबत एका बाईक ब्रँडच्या जाहिरातीतही काम केलं होतं, जिथे त्याचा लूक ‘ॲनिमल’ चित्रपटातील रणबीर कपूरच्या भूमिकेसारखा होता. त्या जाहिरातीनंतर धोनीच्या अभिनयकौशल्यावर लोकांनी लक्ष वेधलं होतं.

क्रिकेटच्या मैदानावर धोनी अजूनही आपली छाप सोडतो आहे. अलीकडेच त्याने आयपीएलच्या इतिहासात २०० झेल पूर्ण करणारा पहिला खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे, ज्यामुळे तो अजूनही क्रिकेटप्रेमींच्या मनावर राज्य करायला तयार झाला आहे.

धोनी खरोखरच अभिनय क्षेत्रात उतरतो की ही केवळ जाहिरात आहे, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. मात्र, त्याचा नवा लूक आणि अभिनयाची झलक पाहून चाहत्यांमध्ये चर्चेला चांगलंच खाद्य मिळालं आहे.

Title : MS Dhoni entry into acting? 

Join WhatsApp Group

Join Now