महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज!

On: September 9, 2025 12:58 PM
MS Dhoni
---Advertisement---

MS Dhoni | क्रिकेटचा मैदान गाजवल्यानंतर ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आता अभिनयाच्या क्षेत्रातही धमाका करण्याच्या तयारीत आहे. धोनी लवकरच प्रसिद्ध अभिनेता आर. माधवनसोबत (R. Madhavan) ‘द चेस’ (The Chase) नावाच्या एका प्रोजेक्टमध्ये दिसणार असून, याचा एक जबरदस्त टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. खुद्द आर. माधवनने हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

महेंद्रसिंह धोनी अभिनयाच्या क्षेत्रात धमाका :

या टीझरमध्ये, धोनी आणि माधवन हे दोघेही ‘टास्क फोर्स ऑफिसर’च्या भूमिकेत दिसत आहेत. काळ्या रंगाचे कपडे, बुलेटप्रुफ जॅकेट आणि काळा गॉगल अशा धाडसी अवतारात ते दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये धोनीची ओळख ‘द कूल हेड’ म्हणून, तर आर. माधवनची ओळख ‘द रोमँटिक ऑफिसर’ म्हणून करून देण्यात आली आहे. ‘एक मिशन, दोन फायटर… एका थरारक पाठलागासाठी तयार व्हा,’ असे कॅप्शन माधवनने या टीझरला दिले आहे.

MS Dhoni | व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल :

प्रसिद्ध दिग्दर्शक वसन बाला (Vasan Bala) यांनी या प्रोजेक्टचे दिग्दर्शन केले आहे. मात्र, ‘द चेस’ हा चित्रपट आहे, वेब सिरीज आहे की एखादी जाहिरात, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. टीझरच्या शेवटी फक्त ‘कमिंग सून’ असे म्हटले आहे. असे असले तरी, हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, नेटकरी त्यावर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

यापूर्वी महेंद्रसिंह धोनीने तमिळ चित्रपट ‘गोठ’मध्ये एक छोटी भूमिका (कॅमिओ) केली होती. त्यामुळे आता या नव्या प्रोजेक्टमधून धोनीला एका पूर्ण भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत.

News title : MS Dhoni and R Madhavan Star in ‘The Chase’ Teaser

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now