“हे चालणार नाही…”; खासदार मेधा कुलकर्णींकडून कोथरूड येथील गरबा-दांडिया कार्यक्रम बंद

On: September 28, 2025 3:46 PM
Pune Railway Station Rename
---Advertisement---

Pune News | पुण्यातील कोथरूड (Kothrud) येथील ‘जीत’ मैदानात शनिवारी (27 सप्टेंबर) सायंकाळी सुरू असलेला गोंगाटयुक्त गरबा-दांडिया कार्यक्रम खासदार डॉ. मेधा कुलकर्णी (Medha Kulakarani) यांनी थेट मैदानावर जाऊन बंद केला. या कारवाईमागे मुख्य कारण म्हणजे मोठ्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांचा त्रास होत असल्याचे त्यांना समजले.

खासदार कुलकर्णींचा थेट हस्तक्षेप

पुण्यात ठिकठिकाणी नवरात्री निमित्ताने गरबा (Garaba) आणि दांडियाचं (Dandiya) आयोजन करण्यात आलं आहे. कोथरूडमध्ये देखील गरब्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुणांनी प्रचंड गर्दी केली होती. शुक्रवारी रात्री कार्यक्रमात आवाजाची मर्यादा ओलांडल्याचं समोर आलं. खुद्द भाजपच्या (BJP) खासदार मेधा कुलकर्णी यांची तक्रार पोलिसांकडे केली होती. पण, तरीही दुसऱ्या दिवशी शनिवारीही पुन्हा तोच प्रकार घडला.

कार्यक्रमाचा आवाज इतका उंच होता की, शेजारील नागरिकांना गंभीर त्रास सहन करावा लागत होता. विद्यार्थी अभ्यासात अडथळा येत होते, रुग्ण रात्री झोपू शकत नव्हते, तर ज्येष्ठ नागरिकांना आवाजामुळे आरोग्याची तक्रार होऊ लागली होती. अनेक पालकही मुलांच्या शालेय परीक्षेच्या काळात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कार्यक्रमांमुळे चिंतेत होते.त्यानंतर कार्यक्रमाच्या स्टेजवर जाऊन मेधा कुलकर्णी यांनी कार्यक्रम बंद पाडला.

पोलिसांच्या निष्क्रियतेवरही गंभीर आरोप

कुलकर्णींनी पोलिसांच्या निष्क्रियतेवरही गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले, मी पोलीस (Police) अधिकाऱ्यांशी आधीच संपर्क केला होता, परंतु कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे त्यांनी म्हटले. आवाजाच्या नियमांचं उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अन्यथा हे प्रकार वाढतील,”

स्थानिक नागरिकांनी खासदारांच्या या निर्णयाचे स्वागत केले. स्थानिक नागरिकांच्या मते, या कारवाईमुळे पर्यावरणातील शांतता आणि नागरिकांचे आरोग्य राखले जाईल. अनेकांनी प्रशासनाने भविष्यात अशा कार्यक्रमांवर कडक नियंत्रण ठेवावे अशी मागणी केली आहे.

News Title :- “This Won’t Do…”: MP Medha Kulkarni Shuts Down Garba-Dandiya Event in Kothrud 

Join WhatsApp Group

Join Now