ओला, उबर, रॅपिडो सेवांसाठी नवे नियम लागू! जाणून घ्या शुल्क अन् अटी

On: October 11, 2025 5:45 PM
Motor Vehicle Aggregator Rules
---Advertisement---

Motor Vehicle Aggregator Rules | राज्यातील ॲप-आधारित प्रवासी वाहतूक सेवा आता अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक होणार आहेत. महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र मोटर वाहन ॲग्रीगेटर नियम, 2025” या मसुदा नियमांची घोषणा केली असून ओला, उबर, रॅपिडो सारख्या कंपन्यांसाठी नवे परवाना शुल्क, सुरक्षा ठेव, तसेच चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक अटी निश्चित केल्या आहेत. हे नियम मोटर वाहन कायदा, 1988 च्या कलम 73, 74 आणि 93 अंतर्गत प्रस्तावित आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, या नियमांवर हरकती व सूचना 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत मागवण्यात आल्या असून त्यानंतर नियम अंतिम केले जातील. (Motor Vehicle Aggregator Rules 2025)

कोणावर लागू होतील हे नियम? :

नवीन नियम सर्व प्रकारच्या प्रवासी मोटार वाहनांच्या ॲग्रीगेटरवर लागू होणार आहेत. म्हणजेच, ओला-उबरसारख्या ॲप-आधारित कॅब सेवांसोबत ई-रिक्षा सेवाही या चौकटीत येतील.

बाईक-टॅक्सी सेवांसाठी मात्र स्वतंत्र “महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम, 2025” लागू राहतील आणि त्यासाठी वेगळा परवाना आवश्यक असेल. यामुळे राज्यातील सर्व ॲप-आधारित वाहतूक सेवांमध्ये एकसमान मानक आणि जबाबदाऱ्या निश्चित केल्या जातील.

Motor Vehicle Aggregator Rules | परवाना शुल्क आणि सुरक्षा ठेव किती? :

राज्य परिवहन प्राधिकरण (प्रति जिल्हा):

परवाना देणे – ₹10,00,000
नूतनीकरण शुल्क – ₹25,000

प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (प्रति जिल्हा):

परवाना देणे – ₹2,00,000
नूतनीकरण शुल्क – ₹5,000

सुरक्षा ठेव (वाहनसंख्येप्रमाणे):

100 बस किंवा 1,000 वाहनांपर्यंत – ₹10 लाख
1,000 बस / 10,000 वाहनांपर्यंत – ₹25 लाख
1,000 हून अधिक बस / 10,000 हून अधिक वाहनं – ₹50 लाख

भाड्याचे नियमन आणि सर्ज प्राइसिंगचे नियम :

– सरकारने भाड्याच्या दरात पारदर्शकता आणण्यासाठी मर्यादा निश्चित केल्या आहेत.

– सर्ज प्राइसिंग: मागणी वाढल्यास भाडे वाढवता येईल, परंतु ते मूळ दराच्या 1.5 पटांपेक्षा जास्त असू नये. (Motor Vehicle Aggregator Rules 2025)

– मागणी कमी झाल्यास: भाडे मूळ दराच्या 25% पेक्षा कमी ठेवता येणार नाही.

– सुविधा शुल्क: रायडरकडून आकारले जाणारे शुल्क मूळ भाड्याच्या 5% पेक्षा जास्त असू नये आणि एकूण कपात 10% पेक्षा अधिक नसावी.

चालक व वाहनांसाठी कडक अटी :

– नव्या नियमांनुसार चालकांचे कामाचे तास, प्रशिक्षण आणि वाहनांची स्थिती यावर विशेष भर देण्यात आला आहे.

– चालक दिवसात जास्तीत जास्त 12 तास ॲपवर लॉग-इन राहू शकतो; त्यानंतर 10 तास विश्रांती आवश्यक.

– चालकांना ॲपशी जोडण्यापूर्वी 30 तासांचा प्रेरणा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करावा लागेल.

– चालकाचे सरासरी रेटिंग 2 स्टार्सपेक्षा कमी असल्यास त्याला सुधारात्मक प्रशिक्षण घ्यावे लागेल.

– प्रत्येक प्रवासासाठी प्रवाशाला ₹5 लाखांपर्यंतचा विमा कवच उपलब्ध असणे अनिवार्य.

– ऑटोरिक्षा आणि मोटारकॅब 9 वर्षांपेक्षा जुनी नसावी, तर बस 8 वर्षांपेक्षा जुनी नसावी.

News Title: Maharashtra Motor Vehicle Aggregator Rules 2025: New licensing fees, surge pricing cap, and driver-hour limits for Ola, Uber, Rapido

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now