मॉर्निंग वॉक करताना या चुका टाळा, नाहीतर होऊ शकतो आरोग्याचा फटका!

On: May 2, 2025 3:51 PM
Morning Walk Tips
---Advertisement---

Morning Walk Tips | धावपळीच्या जीवनशैलीत नियमित व्यायाम करणं आवश्यक असलं तरी तो योग्य पद्धतीने करणं तितकंच महत्त्वाचं आहे. अनेक लोक आरोग्य टिकवण्यासाठी मॉर्निंग वॉक करतात. पण काही लहान-लहान चुका केल्यास याचा फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं. आज आपण जाणून घेणार आहोत की मॉर्निंग वॉक (Morning Walk Tips) करताना कोणत्या चुका टाळायला हव्यात.

पाणी न पिता वॉकला जाणं :

काही लोक सकाळी पाणी न पिता चालायला निघतात. पण यामुळे शरीरात डिहायड्रेशन होण्याची शक्यता वाढते. चालताना डोकेदुखी, थकवा, चक्कर येणे यासारखे त्रास होऊ शकतात. त्यामुळे वॉकला (Morning Walk Tips) निघण्याआधी थोडंसे पाणी प्यावं, जेणेकरून शरीराला आवश्यक ती हायड्रेशन मिळेल.

सकाळी चालायला गेल्यास तुम्हाला अशक्तपणा आणि थकवा जाणवू शकतो. त्यामुळे मॉर्निंग वॉकला निघण्याआधी थोडेसे ड्रायफ्रूट्स, फळं किंवा ज्यूस घेणं फायदेशीर ठरतं. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि वॉक अधिक प्रभावी होतो.

Morning Walk Tips | वॉकपूर्वी कॉफीचं सेवन :

काही लोक वॉकला निघण्याआधी कॉफी पितात. पण रिकाम्या पोटी कॉफीतील कॅफिनमुळे डिहायड्रेशन वाढू शकतं आणि पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो. त्यामुळे वॉक करून आल्यावर काही वेळाने कॉफी घेणं योग्य ठरतं. (Morning Walk Tips)

वॉक करताना कम्फर्टेबल शूज आणि सैलसर कपडे घालणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे चालताना आरामदायक वाटतं आणि पायांना दुखापत होण्याची शक्यता कमी होते.

स्ट्रेचिंगचा अभाव :

वेगाने चालण्याआधी कमीत कमी 5 मिनिटं स्ट्रेचिंग करणं आवश्यक आहे. यामुळे स्नायूंमध्ये लवचिकता येते आणि कोणतीही दुखापत टाळता येते.

वॉक करताना अत्याधिक पाणी पिऊ नये. फक्त 1-2 घोट पुरेसं असतं. खूप पाणी पिल्यास पोटात दुखू शकतं आणि वॉकमध्ये अडथळा निर्माण होतो.

News Title: Morning Walk Tips: Common Mistakes to Avoid While Walking Daily

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now