Monsoon Back Pain | पावसाळा अनेकांसाठी तो पाठदुखी आणि सांधेदुखीचा त्रास घेऊन येतो. हवेतील वाढती आर्द्रता आणि वातावरणातील दाबातील चढ-उतार यामुळे अनेकांना पाठीचा कणा आणि सांध्यांसंदर्भात वेदनादायक अनुभव येतो. विशेषतः ज्यांना आधीच मणक्याच्या समस्या, संधिवात किंवा बैठ्या जीवनशैलीचा त्रास आहे, त्यांनी या काळात अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात पाठदुखीच्या तक्रारी वाढतात कारण स्नायूंमध्ये कडकपणा, मऊ ऊतींमध्ये सुज, आणि हलचालींमध्ये मर्यादा जाणवू लागतात. याशिवाय, सकाळी किंवा रात्री वेळी ही वेदना अधिक तीव्रतेने जाणवते आणि दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण करते. (Monsoon Back Pain)
हवेतील आर्द्रता आणि पाठीच्या वेदनांचा संबंध :
आर्द्रतेमुळे शरीरातील स्नायूंना सुज येते आणि पाठीच्या कण्यामध्ये कडकपणा जाणवतो. स्लिप डिस्क, सायटिका किंवा ऑस्टियोआर्थरायटिससारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना या हवामानात अधिक त्रास होतो. याशिवाय, जे लोक घरात राहून शारीरिक हालचाल कमी करतात, त्यांना पाठदुखीचा धोका जास्त असतो.
दिवसभर चुकीच्या पोस्चरमध्ये बसणे, लॅपटॉप किंवा मोबाइलवर वाकून काम करणे, नियमित व्यायामाचा अभाव – हे सर्व घटक पाठदुखीला आमंत्रण देतात. तसेच दमट हवामानात निसरड्या पृष्ठभागांमुळे घसरून पडण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे पाठ किंवा सांध्यांना दुखापत होऊ शकते.
Monsoon Back Pain | तज्ज्ञांनी दिलेल्या सोप्या पण प्रभावी टिप्स :
तज्ज्ञांच्या मते पाठीला लवचिक ठेवण्यासाठी रोजचा हलका व्यायाम, स्ट्रेचिंग आणि चालणे अत्यंत उपयुक्त आहे. काम करताना पाठीला योग्य आधार देणारी खुर्ची वापरणे, खांदे आरामात ठेवून बसणे आणि थोड्या थोड्या वेळाने हालचाल करणे आवश्यक आहे. (Monsoon Back Pain)
दुखणाऱ्या भागावर हॉट पॅडचा वापर केल्याने स्नायू सैल होतात आणि वेदना कमी होतात. थंड हवामानात हलका स्वेटर वापरणे, घराबाहेर पडताना काळजी घेणे, आणि जड वस्तू उचलताना योग्य पद्धतीने वाकणे – या सवयी अंगीकारल्यास पावसाळ्यातील पाठदुखीपासून बचाव होतो.






