क्रिकेटर मोहम्मद सिराज ‘या’ दिग्गय गायिकेच्या नातीला करतोय डेट?; अखेर समोर आलं सत्य

On: January 27, 2025 12:24 PM
Mohammed Siraj and janai bhosle
---Advertisement---

Mohammed Siraj | बॉलिवूडच्या (Bollywood) दिग्गज गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांची नात जनाई भोसले (Janai Bhosle) सध्या चर्चेत आहे. २३ वर्षीय जनाई लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. नुकताच तिचा २३ वा वाढदिवस साजरा झाला असून, त्याचे काही फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले होते. (Mohammed Siraj)

या फोटोंमुळेच मागील काही दिवसांपासून जनाई आणि क्रिकेटर मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यांच्या अफेअरची (Affair) चर्चा रंगली होती. दोघे एकमेकांना डेट (Date) करत असल्याचे बोलले जात होते. या चर्चांवर अखेर जनाई आणि मोहम्मद सिराज यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

जनाई आणि मोहम्मद सिराज यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या डेटिंगबद्दल चर्चा सुरू झाल्या.  मात्र आता दोघांनीही यावर मौन सोडले असून, त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे (Instagram Story) त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. हा खुलासा ऐकून चाहत्यांना नक्कीच मोठा धक्का बसेल.

जनाईने शेअर केली इन्स्टा स्टोरी

जनाई भोसलेने मोहम्मद सिराजसोबतचा तोच फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत होता. या फोटोसोबत तिने “माझा प्रिय भाऊ” असे कॅप्शन (Caption) दिले आहे. ही स्टोरी पुन्हा शेअर करताना मोहम्मद सिराजने काही सुंदर ओळी लिहिल्या आहेत. त्याने लिहिले आहे की, “मेरी बहन जैसी कोई बहन नहीं. बिना इसके कहीं मुझें रहना नही. जैसे है चाँद सितारो मैं, मेरी बहन हैं एक हजारों में”. या पोस्टवरून हे स्पष्ट झाले आहे की दोघेही एकमेकांना भाऊ-बहीण मानतात. (Mohammed Siraj)

व्हायरल फोटो आणि चाहत्यांच्या प्रतिक्रिया

जनाईने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. ज्यामध्ये ती आशा भोसलेंसोबत केक (Cake) कापताना दिसली होती. तर एका फोटोत ती भारतीय क्रिकेटर मोहम्मद सिराजसोबत (Mohammed Siraj) बोलताना दिसत आहे.

या फोटोत मोहम्मद सिराज हसताना दिसत आहे. हा फोटो समोर येताच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चाहते दोघांच्या डेटिंगबद्दल अंदाज लावू लागले. एका युजरने तर “हे लग्न करणार आहेत का?” असा प्रश्न देखील विचारला होता.

Title: Mohammed Siraj and janai bhosle dating rumors clarification

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now