होम लोनच्या व्याजावर मिळणार ‘इतक्या’ टक्क्यांची सूट, पण नेमका कोणाला लाभ मिळणार?

On: November 25, 2025 5:21 PM
Home Loan Subsidy
---Advertisement---

Home Loan Subsidy | स्वतःचं घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण वाढलेले प्रॉपर्टी रेट्स, महागाई आणि होम लोनचे व्याजदर यामुळे अनेकांना हे स्वप्न साध्य करणं कठीण जातं. विशेषतः मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी घर घेणं आजही मोठं आव्हान आहे. मात्र आता केंद्रातील मोदी सरकारने घर घेणाऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. (Home Loan Subsidy)

केंद्र सरकारने प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना (Pradhan Mantri Gramin Awas Yojana) अंतर्गत होम लोन व्याजावर थेट 4 टक्के सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवीन घर खरेदी करणाऱ्यांना मोठं आर्थिक लाभ मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील लाखो कुटुंबांसाठी घराचं स्वप्न आता अधिक जवळ आलं आहे.

किती सबसिडी आणि कोणाला मिळणार फायदा? :

प्रधानमंत्री आवास योजना शहरी (PMAY-U 2.0) अंतर्गत ही सबसिडी लागू होणार आहे. मात्र ही सुविधा सर्वांसाठी नाही, तर ठरावीक पात्र गटांसाठीच आहे. 35 लाखांपर्यंत किंमत असलेल्या घरांवर ही सबसिडी मिळणार आहे. तसेच कर्जाची मर्यादा 25 लाखांपर्यंत असावी अशी अट ठेवण्यात आली आहे.

जर एखाद्या व्यक्तीने 12 वर्षांच्या कालावधीसाठी होम लोन घेतले आणि त्याचे कर्ज 8 लाख असेल, तर त्याला 4% व्याज सबसिडी मिळणार आहे. त्यामुळे EMI मध्ये थेट घट होत आर्थिक भार कमी होईल. सरकारच्या मते, ही योजना विशेषतः मध्यमवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी मोठा बदल घडवणार आहे.

Home Loan Subsidy | योजनेचा लाभ कसा मिळवायचा? :

तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी नागरिकांना PMAY-U पोर्टल किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) येथे भेट द्यावी लागेल. अर्ज करताना आधार कार्ड, बीपीएल/SECC पुरावा आणि बँक खात्याची माहिती असणं आवश्यक आहे. (Home Loan Subsidy)

ज्यांचं नाव यादीत नाही किंवा चुकून वगळलं गेलं आहे त्यांना पुन्हा अर्जाची संधी उपलब्ध आहे. मंजुरी ही सरकारच्या वार्षिक अपडेट होणाऱ्या प्राधान्य यादीवर आधारित असेल.

ऑनलाइन नाव कसे तपासायचे? :

लाभार्थी आपलं नाव घरबसल्या मोबाईल किंवा संगणकावरून तपासू शकतात. यासाठी PMAYG अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘IAY/PMAYG Beneficiary’ किंवा ‘लाभार्थी शोधा’ हा पर्याय निवडावा लागतो. नोंदणी क्रमांक नसल्यास, Advanced Search वर क्लिक करून राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडल्यानंतर माहिती मिळते. (Home Loan Subsidy)

या यादीत मंजुरी स्थिती, हप्त्यांची माहिती आणि अर्जाची प्रगती याचाही तपशील दिसून येतो.

News Title: Modi Government Announces 4% Home Loan Interest Subsidy Under PMAY — Who Is Eligible?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now