ऐश्वर्या-अभिषेकचं लग्न थांबवण्यासाठी जान्हवी कपूरने कापली होती नस; मोठा खुलासा समोर

On: August 23, 2024 12:54 PM
Moddel janhvi kapoor cut her wrist during Aishwarya Rai marriage
---Advertisement---

Aishwarya Rai | बॉलीवुड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन या जोडप्याबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात काहीतरी बिनसलं असून दोघेही विभक्त होण्याच्या मार्गावर आहेत, इथपर्यंत या चर्चा झाल्या. या चर्चेला कारणेही तशीच मिळाली. अनेक कार्यक्रमात ऐश्वर्या ही बच्चन कुटुंबापासून वेगळी दिसून आली आहे. अगदी अभिषेकसोबतही ती जास्त दिसून येत नाही. (Aishwarya Rai)

ऐश्वर्याने बच्चन कुटुंबियांचं घर सोडलं असून ती लेक आराध्यासोबत माहेरी राहायला गेल्याचं देखील म्हटलं गेलं. पाहायला गेलं तर, अद्याप ऐश्वर्या-अभिषेक किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून याबाबत कोणतंच अधिकृत विधान करण्यात आलं नाहीये. अशात ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नादरम्यानचा एक किस्सा समोर आला आहे.

जान्हवी कपूरने का कापली होती नस?

2007 साली ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्नगाठ बांधली.पण दोघांच्या लग्नात अनेक अडचणी आल्या. तेव्हा दोघांच्या लग्नाला थांबण्याचा प्रयत्न जान्हवी कपूर हिने केला होता, अशी माहिती समोर आली आहे. इतकंच नाही तर, जान्हवीने लग्न थांबवण्यासाठी स्वतःच्या हाताची नस कापून घेतली होती. काही मीडिया रिपोर्टमध्ये याबाबत दावा करण्यात आला आहे. (Aishwarya Rai)

आता चहत्यांना प्रश्न पडला असेल की, जान्हवी कपूर असं का करेल?, तर ही मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर नसून एक मॉडेल आहे. तिने लग्नावेळी मोठा दावा केला होता. अभिषेक बच्चन आणि माझं लग्न झालं आहे… असा दावा जान्हवी कपूर नामक मॉडेल मुलीने केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नात गोंधळ घालणारी जान्हवी कपूर नेमकी कोण?

अभिषेकने माझ्यासोबत गुपचुप 2006 मध्ये लग्न केल्याचा दावा या मॉडेलने केला होता. इतकंच नाही तर, जान्हवी हिने अभिषेक विरोधात पोलिसांत तक्रार देखील दाखल केली होती. पण कोणतेच पुरावे नसल्यामुळे जान्हवी पोलिसांसमोर काहीही साध्य करु शकली नाही. ज्यामुळे पोलिसांनी देखील तक्रार दाखल करण्यास नकार दिला. (Aishwarya Rai)

ही घटना बऱ्याच जणांना माहित नाही. मात्र, आता हे प्रकरण चर्चेत आलंय. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नाबद्दल बोलायचं झाल्यास दोघांनी लग्नात फार कमी लोकांना निमंत्रित केलं होतं. दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो अजूनही व्हायरल होत असतात. अशात त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत आहेत.

News Title :  Moddel janhvi kapoor cut her wrist during Aishwarya Rai marriage

महत्त्वाच्या बातम्या-

पुणे, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; IMD कडून महत्वाचा इशारा

“बावनकुळे राजकारणातली वाया गेलेली केस, त्यांनी..”; संजय राऊतांची जहरी टीका

गुडन्यूज! PM आवाज योजनेत आता ‘या’ लोकांनाही मिळेल हक्काचे घर

आनंदवार्ता! सोनं तब्बल ‘इतक्या’ हजारांनी घसरलं, काय आहेत सध्या भाव?

नीरज चोप्राने मोडला ऑलिम्पिकचा रेकॉर्ड; पाहा डायमंड लीगमधील बेस्ट थ्रो VIDEO

Join WhatsApp Group

Join Now