आम्ही हे करु! मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध, राज ठाकरेंकडून मोठ्या घोषणा

On: November 15, 2024 1:46 PM
MNS manifesto released
---Advertisement---

MNS manifesto | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जाहिरनामे प्रसिद्ध केले जात आहेत. महायुतीसह महाविकास आघाडीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत घोषणा आणि आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज 15 नोव्हेंबररोजी ‘आम्ही हे करू’ या यावाने आपला जाहीरनामा प्रकाशीत केला आहे. (MNS manifesto )

यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष्य देण्यात आलं आहे. मनसेला आता 19 वर्षे झाली आहेत. या 19 वर्षात पक्षाने काय-काय केले त्याची माहितीही यात देण्यात आली आहे.आमच्या जाहीरनाम्यामध्ये ब्ल्यू प्रिंटच्या अनेक गोष्टी आणलेल्या आहेत याचं कारण, विषय बदलले नाहीत. प्रश्न बदललेले नाहीत, अद्यापही तेच प्रश्न आहेत. अजूनही आपण त्याच प्रश्नांवर चर्चा करत आहोत म्हणून मला असं वाटतं की आज हा जाहीरनामा तुमच्यासमोर ठेवत आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जाहीरनाम्यात चार महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. महिला, तरुण, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा आणि आश्वासन देण्यात आली आहेत. जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना राज ठाकरे यांनी चार कलमी कार्यक्रम प्रसिद्ध केला. (MNS manifesto)

मनसेच्या जाहीरनाम्यातील 10 प्रमुख घटक-

  1. मूलभूत गरजा आणि दर्जेदार जीवनमान
  2. दळणवळण, वीज, पाण्याचे नियोजन
  3. सक्षम स्थानिक प्रशासन प्रकल्पासाठी लोकसहभाग 
  4. राज्याची औद्योगिक प्रगती 
  5. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार (MNS manifesto)
  6. गडकिल्ले संवर्धन
  7. कृषी आणि पर्यटन व व्यावसायिक शिक्षण
  8. प्रशासन आणि उद्योग नियंत्रण
  9. डिजिटल प्रशासनाला प्रोत्साहन (MNS )
  10. घनकचरा व्यवस्थापन आणि मलनि:सारण (MNS manifesto )

News Title –  MNS manifesto released

महत्त्वाच्या बातम्या-

‘मुख्यमंत्री होणं माझ्यासाठी..’; CM पदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा सर्वात मोठा खुलासा

राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळणार?, आणखी एक सर्व्हे समोर

शाळकरी विद्यार्थ्यांना या महिन्यात सलग 4 दिवस सुट्ट्या मिळणार, कारण..

खरेदीची करा घाई! सोनं झालं स्वस्त, सराफा बाजारात काय आहेत सध्या किंमती?

दिशा सालियन प्रकरणी पुन्हा चौकशी लावणार, ‘या’ नेत्याचा आदित्य ठाकरेंना इशारा

Join WhatsApp Group

Join Now