“माझी नातवंडं टाहो फोडून रडतायत, तिघांनी शब्द दिला…”; मंत्रीपदावरून शिवतारे संतापले

On: December 19, 2024 10:23 AM
MLA Vijay Shivtare Anger on mahayuti 
---Advertisement---

Vijay Shivtare | महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार रविवारी पार पडला. यावेळी भाजपासह शिवसेना आणि अजित पवार गटातील अनेक दिग्गज नेत्यांना डावलण्यात आलं. तर, तिन्ही पक्षांनी यंदा नव्या चेहऱ्यांना संधी दिली.यामुळे मंत्रीपदासाठी इच्छुक असलेले अनेक आमदार प्रचंड नाराज झाले आहेत. पुरंदरचे शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare ) यांनाही मंत्रीपद मिळेल, अशी आशा होती. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही. यावरून ते प्रचंड संतापले आहेत.

“शपथविधी सुरू असताना मंत्रीमंडळात स्थान मिळेल, अशी शेवटच्या क्षणापर्यंत अपेक्षा होती. पण सगळा शपथविधी पार पडला, तरी माझं नाव आलं नाही. प्रचंड चीड आली. माझी नातवंडं टाहो फोडून रडतायत”, अशा शब्दांत शिवतारे यांनी नाराजी व्यक्त केली.

काय म्हणाले विजय शिवतारे?

शपथविधी सोहळ्यासाठी माझं संपूर्ण कुटुंब आलं होतं. सर्व जण मला मंत्रीपद मिळेल या प्रतीक्षेत होते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आता नाव येईल, आता नाव येईल, अशी अपेक्षा होती. पण सगळा शपथविधी पार पडला पण नाव नाही आलं. हेच त्यांच्या घरात झालं असतं, अशा प्रकारे वागणूक मिळाली असती तर राग आला नसता का?, माझी प्रचंड चीड झाली, असं शिवतारे म्हणाले.

पुढे बोलताना शिवतारे म्हणाले की, “मला तिघांनी मिळून शब्द दिला होता. विधानसभेच्या वेळी काही अडचण येणार नाही. आम्ही सगळे एक आहोत. आतापर्यंत तुम्ही आमची दुष्मणी पाहिली, आता दोस्ती बघा, असं तेच बोलले होते. आता तुमची दोस्ती महाराष्ट्रानं बघितली. तुमच्या वक्तव्याला किती किंमत आहे, हेही लक्षात आलं. आम्ही मात्र दिलेला शब्द पाळला”, असं म्हणत शिवतारे (Vijay Shivtare ) यांनी संताप व्यक्त केलाय.

“मंत्रीपद कापण्या इतपत त्यांची पोहोच…”

पुढे शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील अप्रत्यक्षरीत्या वार केला. “आमच्या वाईटावर असून सुद्धा मी तब्बल 27 हजाराच्या मताधिक्यक्याने निवडून आलो. त्यामुळे मला त्यांची सेवा करायची आहे. तसेच कोण वाईटावर आहे हे सगळ्यांना माहित आहे, त्याच्यामुळे कशाला ते बोलायचं. याशिवाय माझे मंत्रीपद कापण्या इतपत त्यांची पोहोच देखील नाही”, असं म्हणत शिवतारे (Vijay Shivtare ) यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला लगावला.

News Title –  MLA Vijay Shivtare Anger on mahayuti 

महत्त्वाच्या बातम्या-

वर्षाच्या शेवटी सोन्याची आनंदवार्ता, ‘इतक्या’ रुपयांनी घसरले भाव

निवडणूक होताच प्रवाशांना पहिला झटका, लालपरीचा प्रवास महागणार?

आज गुरुवारी, देवी लक्ष्मी ‘या’ 3 राशींवर करणार धन व सुखाचा वर्षाव!

राधिका आपटेचे प्रेग्नंसीचे नको तसले फोटो व्हायरल!

निधनानंतर जसा मातंग होता, तसा…; विजय शिवतारेंची तिखट भाषेत नाराजी व्यक्त

Join WhatsApp Group

Join Now